हैदराबाद :कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरु होतो. हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणं मार्गशीर्ष महिन्यालाीही आधिक महत्व आहे. मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचं मानलं जातं. तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, या व्रतामुळं भक्तांना वैभव, यश, समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते. यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून माहिला महालक्ष्मीची पूजा करून उपास करतात.
पूजा कशी करावी?: गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करा. त्यानंतर चौरंग किंवा पाटावर लाल कापड पसरवून तांदळावर तांब्याचा कलश ठेवा. कलशाला हळदी-कुंकू लावा. कळसाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा, नाणं, सुपारी टाका. कळसाला विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवा त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवा. पाटावरील लाल कपड्यावर तांदूळ पसरवून कलशाची स्थापना करावी. त्यावर लक्ष्मी देवीचा फोटो ठेवा. विडा, खोबरे, फळे, खडीसाखर आणि गूळ ठेवा. त्यानंतर महालक्ष्मीची विधीवत पूजा करून महालक्ष्मीची कथा वाचा, नैवेद्य दाखवा आणि आरती करा.
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार तारीख
- दुसरा मार्गशीर्ष गुरुवार – 12 डिसेंबर 2024
- तिसरा मार्गशीर्ष गुरुवार : 19 डिसेंबर 2024
- चौथा मार्गशीर्ष गुरुवार : 26 डिसेंबर 2024
कधी आहे शुभ मुहूर्त(Margashirsha Guruvar Shubh Muhurta) : मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी आहे. या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5.26 ते 7.40 पर्यंत आहे. तसेच गुरुवारी मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी रात्री 10.27 पर्यंत राहील.