महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

Mahashivratri 2024 : शिव पार्वती विवाह कथा; महाशिवरात्री तारीख, पूजा मुहूर्त आणि विधी घ्या जाणून - Puja Vidhi And Shubh Muhurat

Mahashivratri 2024 : हिंदू धर्मात महाशिवरात्रीला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. 'महाशिवरात्र' हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. 'महाशिवरात्र' देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. शिव-पार्वतीचा विवाह (Shiv Parvati Marriage Ceremony) याच दिवशी झाला, असं मानलं जातं. यावर्षी 'महाशिवरात्र' 8 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे.

Mahashivratri 2024
महाशिवरात्री 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 7, 2024, 12:21 PM IST

Mahashivratri 2024 : 'महाशिवरात्र' हा सण शिवपूजेसाठी खूप खास मानला जातो, या दिवशी शिवलिंगात साक्षात महादेवाचा म्हणजे शिवाचा वास असतो, अशी श्रद्धा आहे. पंचांगानुसार, दरवर्षी फाल्गुन महिन्यातील चतुर्दशी तिथीला 'महाशिवरात्र' साजरी केली जाते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह (Shiv Parvati Marriage Ceremony) झाला होता, अशी धार्मिक मान्यता आहे. तेव्हापासून हा उत्सव 'महाशिवरात्र' या नावानं प्रचलित झाला आहे.

महाशिवरात्री 2024 मुहूर्त : पंचांगानुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथी 8 मार्चला रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 9 मार्चला संध्याकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी समाप्त होईल. शिवरात्रीला रात्री पूजा केली जात असल्यानं त्यात उदयतिथी पाहण्याची गरज नाही. महाशिवरात्रीची पूजा सूर्योदयापासून दिवसभरात केव्हाही करता येते. मात्र, प्रदोष आणि निशिथ काळतील पूजेला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार, 9 मार्चला मध्यरात्री 12 वाजून 07 मिनिट ते 12 वाजून 56 मिनिटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल.

व्रताची पूजा करण्याची पद्धत :सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. देवासमोर हात जोडून महाशिवरात्री व्रताची पूजा करावी. यानंतर शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला अभिषेक करावा. जर तुम्ही घरी पूजा करत असाल तर नियमानुसार शुभ मुहूर्तावर पूजा करावी. घरी देखील देवघर स्वच्छ करावे. मातीच्या भांड्यात पाणी किंवा दूध भरून त्यावर बेलपत्र, आक-धतुरा, तांदूळ इत्यादी टाकून ते शिवलिंगाला अर्पण करावं. जवळपास शिवमंदिर नसेल तर घरात मातीचे शिवलिंग बनवून पूजा करावी.

महामृत्युंजय मंत्राचा पाठ : महाशिवरात्रीला पूजेनंतर फळे आणि मिठाईचा नैवेद्य घ्यावा. या दिवशी शिवपुराण आणि 'महामृत्युंजय मंत्रा'चा पाठ किंवा 'ओम नमः शिवाय' या पाच अक्षरी मंत्राचा जप करावा. यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रपाळीचाही नियम आहे. महाशिवरात्रीला पूर्ण भक्तिभावाने केलेली प्रार्थना नक्कीच मान्य होते. म्हणूनच या दिवशी भगवान भोलेनाथ यांची पूजा नियमानुसार केली पाहिजे. शास्त्रीय नियमांनुसार शिवरात्रीची पूजा 'निशीथ काळा'मध्ये करणं उत्तम. मात्र, भाविक त्यांच्या सोयीनुसार रात्रीच्या कोणत्याही प्रहरात ही पूजा करू शकतात.

भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह : भगवान शिव आणि आदीशक्ति पार्वती यांच्या विवाहाच्या स्मरणार्थ संपूर्ण देशभरात 'महाशिवरात्री'चा सण साजरा केला जातो. भगवान शिवाला आपल्या पतीरूपात प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीनं कठोर तपश्चर्या केली होती. शिव तपस्येनं प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीशी विवाह केला, अशी श्रद्धा आहे.

हेही वाचा -

  1. Women's Day 2024 : युनायटेड नेशन्सच्या 'या' थीमवर साजरा होणार वर्ष 2024 चा 'महिला दिन'
  2. Mahashivratri : साडेतीनशे वर्ष जुन्या असलेल्या बाबुलनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी
  3. Mahashivratri : आठ क्विंटल शेंगदाण्यापासून बनवलेले २५ फूट उंच शिवलिंग.. दर्शनासाठी भाविकांची गर्दी

ABOUT THE AUTHOR

...view details