महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

'या' राशींच्या उमेदवारांनी थोडं सावध राहा कारण…; आज तुमच्या राशीत काय?, वाचा राशीभविष्य - HOROSCOPE 20 NOVEMBER 2024

आज राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होत आहे. तर 12 राशीचं दैनंदिन जीवन कसं राहील जाणून घेऊया 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Horoscope 2024
राशीभविष्य 2024 (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2024, 12:10 AM IST

मेष (ARIES): चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात असेल. आजची सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल आहे. सरकारी लाभ होतील. व्यापार- व्यवसायात लाभ होतील. नोकरीत वरिष्ठ खुश होतील. आपल्या विचारात एकदम बदल होईल. दुपारनंतर मात्र मनाचा खंबीरपणा कमी होऊन मन विचारात गढून जाईल. मानसिक शैथिल्य जाणवेल. अपघाताची शक्यता असल्यानं पाण्यापासून दूर राहावे.

वृषभ (TAURUS) :चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात असेल. आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी आहे. मित्र आणि स्नेहीजनांच्या सहवासानं आपण आनंदित व्हाल. आज दिवसाचा बहुतांश वेळ आपण आर्थिक नियोजन करण्यासाठी द्याल.

मिथुन (GEMINI) : चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. आज आप्तेष्टांचा सहवास आनंददायी ठरेल. सुंदर वस्त्रे आणि उत्तम भोजनाचा लाभ होईल. मनात विविध प्रकारचे नकारात्मक विचार येतील, ते दूर सारणे हितावह राहील. व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल असल्यानं मन प्रसन्न राहील. दिवसभर मनात उत्साह आणि चैतन्य दरवळेल.

कर्क (CANCER) : चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बाराव्या भावात असेल. आजचा दिवस प्राप्तीच्या प्रमाणात अधिक खर्च करण्याचा आहे. नेत्र विकार बळावतील. मानसिक चिंता वाढतील. कोणाशी वाद होऊ नयेत म्हणून आपल्या कृतींवर संयम ठेवा. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. आर्थिक लाभ संभवतात. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. मनातून नकारात्मक विचार दूर होऊ शकतील.

सिंह (LEO) : चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात असेल. आजची सकाळची वेळ फारच चांगली आहे. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांत आनंददायक आणि लाभदायक बातम्या प्राप्त होतील. मित्रांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल. दुपारनंतर आपल्या बोलण्यामुळं काही समस्या उदभवण्याची शक्यता आहे. अपघाताची शक्यता आहे. एखादी मानसिक चिंता सतावेल. कुटुंबीय आणि संतती यांच्याशी मतभेद होण्याचे प्रसंग घडतील. प्रकृतीस त्रास संभवतो.

कन्या (VIRGO) : चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. कुटुंबियांशी सलोखा राहील. आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळू शकतील. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर खुश होतील. त्यामुळं आपण आनंददित व्हाल. दुपारनंतर आपली उक्ती आणि कृती यांमुळं काही समस्या उदभवण्याची शक्यता आहे. एखादा अपघात संभवतो. जवळपासच्या एखाद्या रमणीय स्थळी सहलीस जाल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. मित्रांकडून लाभ होतील.

तूळ (LIBRA) :चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात भावात असेल. आज सकाळी आपले मन चिंतातुर होईल. शारीरिकदृष्टया शैथिल्य आणि आळस वाढेल. नोकरीत वरिष्ठ नाराज होतील. संततीशी मतभेद संभवतात. दुपारनंतर कामाच्या ठिकाणी वातावरण बदलेल. वरिष्ठांची मर्जी संपादन केल्यानं पदोन्नती मिळविण्याचा आपला मार्ग सुकर होईल. सामाजिक क्षेत्रातही मान-सन्मानाचे प्रसंग येतील. प्रकृती उत्तम राहील.

वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आज शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. हातून एखादे अवैध कार्य होण्याची शक्यता आहे. मानहानी संभवते. आपलं बोलणं संयमित ठेवल्यास परिस्थिती आपणास अनुकूल होऊ शकेल. पोटदुखीच्या विकारानं त्रस्त व्हाल. व्यावसायिक क्षेत्रात अडचणी येतील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. व्यापार-व्यवसायात प्रतिकूलता जाणवेल.

धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. सकाळी मनोरंजनात्मक कार्यात सहभागी व्हाल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. दुपारनंतर मात्र मनात नकारात्मक विचारांचे वादळ निर्माण होईल. त्यामुळं मन दुःखी होईल. रागाचे प्रमाण वाढेल. कुटुंबीय आणि सहकार्यांशी वाद संभवतात.

मकर (CAPRICORN) : चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. आज आपणास आपली वाणी संयमित ठेवावी लागेल. घरातील वातावरण आनंददायी राहील. सामाजिक मान-सन्मान संभवतात. आर्थिक लाभ होतील. दुपारनंतर स्वकीय आणि मित्र यांच्या सहवासात आनंदित होऊ शकाल. वाहनसौख्य मिळेल. त्यामुळं मन प्रसन्न राहील. मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊन आनंदित व्हाल.

कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. आज आपल्यात कलेविषयी विशेष गोडी निर्माण होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. संतती विषयक प्रश्न भेडसावतील. दुपारनंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील. शारीरिक स्वास्थ्य सुधारेल. आर्थिक लाभ होतील. व्यापार-व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. वाणीवर मात्र नियंत्रण ठेवावं लागेल.

मीन (PISCES) : चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज आपण अती भावनाशील व्हाल. अती विचारांमुळं मानसिक थकवा जाणवेल. सबब जमीन, घर, संपत्ती इ. विषयी चर्चा टाळणे हितावह राहील. अपचन आणि पोटाच्या तक्रारीमुळं शारीरिक अस्वस्थता जाणवेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस लाभदायक आहे. प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. मानहानी संभवते.

हेही वाचा -

कसा असेल तुमच्यासाठी येणारा आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

ABOUT THE AUTHOR

...view details