महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

कशी असेल सर्व राशींच्या आठवड्याची सुरुवात? वाचा राशीभविष्य - Horoscope In Marathi

Today Horoscope : कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल? जोडीदाराची साथ कोणाला मिळेल? कशी मिळेल? तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 26 फेब्रुवारी 2024 च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ...

Horoscope 2024
राशी भविष्य 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 26, 2024, 5:11 AM IST

  • मेष : आज चंद्र सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. आपण एखाद्या काल्पनिक विश्वात रमून जाल. कलावंतांना आपली कला प्रदर्शित करण्याची संधी लाभेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. दैनंदिन कार्यात मात्र काही अडचणी निर्माण होतील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. परिश्रमाचे अपेक्षित यश मिळू शकणार नाही.
  • वृषभ : आज चंद्र सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज आपणास वाणी आणि वर्तन यावर संयम ठेवावा लागेल. अपघाताच्या शक्यतेमुळं जलाशया पासून दूर राहावं. जमीन किंवा संपत्तीच्या दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता असल्यानं सही करताना काळजी घ्यावी लागेल. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. मनात सुंदर कल्पना येतील.
  • मिथुन : आज चंद्र सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज सकाळी कार्यात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. या सर्वांमुळं सकाळी आपण आनंदात असाल. नशिबाची साथ लाभेल. दुपार नंतर मात्र परिस्थितीत बदल होईल. कौटुंबिक मतभेद संभवतात. मातेची प्रकृती नरम गरम होईल. मनात नकारात्मक विचार येतील.
  • कर्क : आज चंद्र सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज द्विधा मनःस्थितीमुळं आपणास दीर्घकालीन योजनेचे आयोजन करताना अडचणी येतील. कुटुंबियांशी वाद होतील. दुपार नंतर मात्र परिस्थितीत अनुकूल बदल होईल. शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. भावंडांकडून काही लाभ प्राप्ती होईल. भावनिक नाते दृढ होईल. मनास शांतता लाभेल.
  • सिंह : आज चंद्र सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपल्या दृढ आत्मविश्वासानं प्रत्येक कामात आपण यशस्वी होऊ शकाल. मात्र, आपणास मन शांत ठेवावं लागेल. सरकारी कामातून फायदा होईल. कुटुंबियांचं अपेक्षित सहकार्य लाभेल. खर्चात मात्र वाढ होईल.
  • कन्या : आज चंद्र सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज भावनेच्या भरात आपल्या हातून एखादी मोठी चुक घडू शकेल. वाद होतील. दुपार नंतर मात्र आत्मविश्वास वाढेल. सामाजिक मान - प्रतिष्ठेत वाढ होईल. रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल.
  • तूळ :आज चंद्र सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. त्यांच्याकडून एखादा फायदा संभवतो. व्यापारात लाभ होईल. कुटुंबियांशी सौहार्दाचे संबंध राहतील. दुपार नंतर मात्र शारीरिक आणि मानसिक आरोग्य नाजूक होईल. वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. एखादा आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
  • वृश्चिक : आज चंद्र सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. दृढ मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर आज आपली सर्व कामे आपण सहजपणे पूर्ण करू शकाल. नोकरी - व्यवसायात आपल्या बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. नोकरीत आपल्या कामगिरीवर वरिष्ठ खुश होतील आणि त्यामुळं आपल्या पदोन्नतीची शक्यता वाढेल. तसेच त्यांच्याकडून एखादा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांकडून सुद्धा फायदा होण्याची शक्यता आहे. दुपार नंतर आपले विचार प्रगल्भ होतील.
  • धनू: आज चंद्र सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आपण सकाळी एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. एखादे नुकसान होण्याच्या शक्यतेमुळं आपणास रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. आपली कामे सहजपणे होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते. घरातील वातावरण खेळीमेळीचं राहील.
  • मकर : आज चंद्र सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज सकाळी प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मनात नकारात्मक विचार थैमान घालतील. अचानकपणे खर्चात वाढ होईल. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल. एखादा प्रवास संभवतो. मनःशांती लाभेल. रागावर मात्र नियंत्रण ठेवावं लागेल.
  • कुंभ : आज चंद्र सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. लहानसहान गोष्टींवरून वैवाहिक जीवनात वाद होतील. हे वाद विकोपास जाऊ शकतात. सांसारिक प्रश्नांविषयी आपण उदासीन व्हाल. कोर्ट - कचेरी पासून दूर राहावे. एखादी मानहानी संभवते. आपण नवीन कामाची सुरवात करू शकाल. स्फूर्ती आणि प्रसन्नतेचा अभाव जाणवेल.
  • मीन : आज चंद्र सिंह राशीस स्थित आहे.आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मन चिंतीत होईल. कार्यात अडचणी येऊन ती पूर्ण होण्यास विलंब होईल. सहकार्यांचं अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. वैवाहिक जीवनात कटकटी निर्माण होतील. सांसारिक जीवनाचा कंटाळा येईल. व्यापारात भागीदारांशी मतभेद संभवतात. शक्यतो कोर्ट - कचेरी पासून दूर राहावं.

ABOUT THE AUTHOR

...view details