महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

'या' राशीच्या लोकांना मिळेल कामात यश; वाचा राशी भविष्य - Today Horoscope - TODAY HOROSCOPE

Today Horoscope : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Today Horoscope
राशी भविष्य (NH DESK)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 4:01 AM IST

  • मेष : चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आजचा दिवस आगळा-वेगळा अनुभव देणारा ठरेल. गूढ आणि रहस्यमय विद्येची गोडी वाटेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस नवीन कामाचा आरंभ करण्यास अनुकूल नाही. प्रवासात अचानक संकटे येतील. क्रोध आणि वाणी ह्यावर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
  • वृषभ: चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातवा भावात असेल. आज कुटुंबीयांसह सामाजिक कार्यात किंवा एखाद्या पर्यटन स्थळी प्रवासाला जाण्याचा आनंद लुटाल. व्यापार्‍यांना व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात यश आणि कीर्ती प्राप्त होईल. अचानक धनलाभाची पण आज शक्यता आहे.
  • मिथुन: चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहावा भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कार्यपूर्ती आणि यश-कीर्ती प्राप्तहोईल. कुटुंबीयांसह आज आनंद, उल्हासपूर्ण वातावरणात सुखात वेळ घालवाल. आर्थिक लाभाची सुद्धा आज शक्यता आहे. महत्वाच्या गोष्टींवर खर्च होईल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहील. तरी सुद्धा आपण वाणी आणि क्रोध यावर संयम ठेवणं आवश्यक आहे. आपलं मन दुखावले जाण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. त्याचबरोबर मान-सन्मान सुद्धा प्राप्त होतील. अपूर्ण कामे तडीस जातील.
  • कर्क : चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचवा भावात असेल. आजचा दिवस शारीरिक ढिलेपणाचा आणि मानसिक तापाचा आहे. मित्र आणि संततीविषयक काळजी राहील. अचानक पैसा खर्च करावा लागेल. वादग्रस्त विषय आज टाळावेत. शक्य असेल तर प्रवास सुद्धा करू नका. अपचन, अजीर्ण असे विकार त्रास देतील. आज बौद्धिक चर्चेपासून ही दोन हात दूर राहणं उचित ठरेल.
  • सिंह: चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज कुटुंबातील वातावरण वाद-विवादाचे राहील. कुटुंबियांशी मतभेद होतील. आईची तब्बेत बिघडू शकते. मनात नकारात्मक विचार येऊन उदासीनता जाणवेल. आजचा दिवस जमीन, घर, वाहन इत्यादी व्यवहार करताना हस्ताक्षर करण्यास अनुकूल नाही. नोकरदारांना पण दिवस अनुकूल नाही. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत याल. अपघाताची शक्यता असल्यानं जलाशयापासून दूर राहा.
  • कन्या: चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसरा भावात असेल. आज शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रेमपूर्ण संबंधांमुळं अगदी भारावून जाल. भावंडांसह वेळ आनंदात जाईल. त्यांच्याकडून लाभ पण होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. नशिबाची साथ मिळेल. आपलं नुकसान टाळण्यासाठी कोणतेही काम विचार पूर्वकच करावं. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.
  • तूळ : चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसरा भावात असेल. आज आपली द्विधा मनःस्थिती राहिल्यानं कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नये. तसेच नवीन काम सुरू करू नका. वाणीवर संयम ठेवल्यास कुटुंबीयांशी वाद होणार नाहीत. जिद्द सोडून समाधानानं राहावं लागेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल.
  • वृश्चिक : चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आज कुटुंबियांसह आनंदात दिवस घालवाल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. एखादी चांगली बातमी मिळेल. स्नेही आणि मित्रवर्ग यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्यानं आनंद होईल. आनंददायी प्रवास घडेल. दांपत्य जीवनात गोडी अनुभवाल. सामान्यतः संपूर्ण दिवस खुशीत जाईल.
  • धनू : चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बारावा भावात असेल. आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेद होतील. स्वभावात क्रोध आणि आवेश राहिल्यानं कोणाशी तीव्र स्वरुपाचं भांडण होईल. आरोग्य बिघडेल. बोलणं आणि वागणं यांवर संयम ठेवावा लागेल. एखादी दुर्घटना संभवते. पैसा जास्त प्रमाणात खर्च होईल. न्यायालयाशी संबंधित कामकाजात जपून पावले उचलावीत.
  • मकर: चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात भावात असेल. आजचा दिवस लाभदायी असून आपण एखाद्या शुभ प्रसंगाचा बेत आखाल. एखाद्या वस्तूची खरेदी करण्यास दिवस अनुकूल आहे. शेअर-सट्टा ह्यात धन लाभ होईल. मित्र आणि संबंधित ह्यांच्या सहवासानं आपण आनंदित व्हाल. सामाजिक क्षेत्रात, नोकरी - व्यवसायात लाभ होईल.
  • कुंभ: चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात भावात असेल. आज आपण वरिष्ठ अधिकारी आणि वयोवृद्धांची मर्जी संपादन करू शकाल. आपली सर्व कामे अगदी सहजपणे पूर्ण होत असल्याचा अनुभव येईल. नोकरी-व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. मानसिक शांतता लाभेल. प्रकृती उत्तम राहील. मान-सन्मान होतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचा अनुभव येईल.
  • मीन: चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात भावात असेल. आज शरीर आणि मन बेचैन राहील. संततीविषयक समस्या काळजी निर्माण करेल. नोकरीत वरिष्ठांशी वाद होऊन त्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. प्रतिस्पर्धी खंबीर बनतील. नकारात्मक विचार मनाला घेरून टाकतील. सरकारकडून एखादा त्रास संभवतो. संततीशी मतभेद होतील.

हेही वाचा -

ABOUT THE AUTHOR

...view details