- मेष (ARIES) :आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज मित्रांच्या सहवासात आपण आनदात वेळ घालवू शकाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. तसेच आपल्याला सुद्धा त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. नवीन मित्रांमुळं भविष्यात लाभ होतील. संततीकडून सुद्धा फायदा होईल. निसर्गरम्य ठिकाणी सहलीस जाण्याचा बेत आखाल. सरकारी कामात यशस्वी व्हाल.
- वृषभ (TAURUS) : आज चंद्र दिवशी कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. नोकरी करणार्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पदोन्नती पण मिळू शकेल. वैवाहिक जीवनात माधुर्य वाढेल. अपूर्ण कामे तडीस जातील. सरकारी लाभ मिळू शकतील.
- मिथुन (GEMINI) :आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस नवीन काम सुरु करण्यास प्रतिकूल आहे. शरीरास थकवा व आळस असल्यामुळं कामात उत्साह वाटणार नाही. पोटाच्या व्याधी त्रस्त करतील. नोकरी-व्यवसायात सुद्धा प्रतिकूल वातावरण असेल. वरिष्ठांच्या नाराजीला तोंड द्यावं लागेल. खर्चात वाढ होईल. महत्वाच्या कामातील कोणताही निर्णय आज घेऊ नये.
- कर्क (CANCER) :आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. वैवाहिक जीवनात वाद होतील. तसेच व्यापारात भागीदारां बरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. सरकारी कामात विघ्ने येतील. कुटुंबात भांडणे होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक अस्वास्थ्य राहील.
- सिंह (LEO):आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात मतभेद होण्याची शक्यता आहे. आपली प्रकृती उत्तम राहील पण जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनात काळजी राहील. सामाजिक जीवनात यश मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास घडेल. मात्र ह्या सहवासाचा त्रास होण्याचं शक्यता असल्याने सावध राहावे.
- कन्या (VIRGO): आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात सुख शांतीचे वातावरण राहिल्यामुळं मन ही प्रसन्न राहील. काही सुखद प्रसंग घडतील. प्रकृती उत्तम राहील. रुग्णांची तब्बेत सुधारेल. आर्थिक लाभ होतील तसेच यशही मिळेल. सहकारी पूर्ण सहकार्य करतील. स्त्रियांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल.
- तूळ (LIBRA): आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस अत्यंत सुखात जाईल. बौद्धिक कामे व चर्चेत दिवस घालवू शकाल. आज कल्पनाशक्ती व सृजनशक्तीचा उपयोग आपण करू शकाल. संततीकडून काही चांगली बातमी मिळेल. आपली प्रगती होईल. स्त्रियांकडून सहकार्य मिळेल. उत्साह आणि आनंदी मन ह्यांचा प्रभाव राहील. मनात सकारात्मक विचार येतील.
- वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शक्यतो आज शांत राहावे. मन चिंतीत राहील व संबंधीतांशी मतभेद होतील. आरोग्याविषयी काळजी लागून राहील. यशहानी किंवा धनहानी होऊ शकते. एखाद्या स्त्रीमुळं आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे. एखादा अपघात संभवत असल्याने शक्यतो जलाशयापासून दूर राहावे. कायदेशीर कार्यवाहीत सावध राहावे लागेल.
- धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपणास एखाद्या गूढ विद्येचे आकर्षण वाटेल. भावंडांशी चांगले संबंध राहतील. नवीन कार्यारंभ करण्यासाठी अनुकूलता लाभेल. मित्रमंडळींशी संपर्क होऊ शकेल. कामात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. एखादा प्रवास संभवतो. नशिबाची साथ मिळेल. सामाजिक मान- सन्मान संभवतात.
- मकर (CAPRICORN) : आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपण शेअर मार्केट किंवा लॉटरी ह्यात गुंतवणूक करू शकाल. अचानक धनलाभ होईल. कुटुंबातील वातावरण वादामुळं बिघडू शकते. काही कारणानं गृहिणींना मनात असंतोष राहील. विद्यार्थ्यांनी अधिक कष्ट घ्यावेत. शारीरिक आरोग्य मध्यम राहील. डोळ्यांचे त्रास संभवतात. नकारात्मक विचारांवर पूर्णतः संयम ठेवावा लागेल. साहसी वृत्ती असलेल्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
- कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपण शरीरानं व मनानं उत्साहित असाल. आजचा दिवस लाभदायी आहे. मित्र - कुटुंबियांसह एखाद्या सहलीला जाऊ शकाल. एखाद्या विषयात प्रगती करू शकाल. मित्राकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखी राहील. नकारात्मक विचारांपासून दूर राहणं हितावह राहील.
- मीन (PISCES) :आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज मन अशांत राहिल्यामुळं एकाग्रतेचा अभाव दिसून येईल. एखाद्या मांगलिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करावी. स्वकियांशी मतभेद संभवतात. एखादया लहानशा फायद्यासाठी मोठे नुकसान होणार नाही ह्याचा विचार करावा लागेल. कोर्टाची कामे काळजीपूर्वक करावी लागतील.
हेही वाचा -