- मेष: आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज सार्वजनिक कार्यक्रमात मित्रांसह वेळ खूप आनंदात जाईल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. त्यांच्याकडून लाभ होईल. निसर्गाच्या सान्निध्यात सहलीला जाल. सरकारी, निम-सरकारी कामात यश मिळेल. दांपत्य जीवनात सुख मिळेल. प्राप्तीचे नवीन स्त्रोत प्राप्त होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
- वृषभ : आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस नवीन कामाचे नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. नोकरी - व्यवसायात लाभदायी परिणाम मिळतील. पदोन्नती होईल. व्यापारात नवीन दिशा स्पष्ट होतील. सरकारकडून लाभ मिळण्याची बातमी मिळेल. मान - प्रतिष्ठा वाढेल. अडलेली कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात माधुर्य राहील.
- मिथुन : आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज दिवसभर थोडया प्रतिकूलतेला तोंड द्यावं लागेल. शरीरात उत्साहाचा अभाव राहील. त्यामुळं नियोजित काम पूर्ण होणार नाही. मानसिक चिंता राहील. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्यांचा मंद प्रतिसाद आपला उत्साहभंग करेल. वरिष्ठ अधिकार्यांशी वादविवाद करू नका. प्रतिस्पर्ध्यां पासून सावध राहा.
- कर्क : आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज संताप आणि नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्य हरवून टाकतील. त्यामुळं आज संयम राखणं आवश्यक आहे. खाण्या-पिण्याकडं लक्ष दिलं नाही तर प्रकृती नक्कीच बिघडेल. कुटुंबात वादविवाद होतील. खर्चात वाढ झाल्यानं आर्थिक चणचण भासेल. नवे संबंध उपयुक्त ठरतील. नवे काम सुरू न करणं हितावह राहील.
- सिंह : आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपल्या दांपत्य जीवनात किरकोळ गोष्टीवरून जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. पति - पत्नी दोधांपैकी एकाची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. परिणामतः प्रापंचिक गोष्टीपासून मन अलिप्त होईल. व्यापारीवर्गानं भागीदारांशी धैर्यानं वागावं. सार्वजनिक जीवनात अपयश येणार नाही याची काळजी घ्या. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास आनंद देणारा नसेल.
- कन्या : आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील. घरात सुख - शांती नांदेल. त्यामुळं मन प्रसन्न राहील. सुखदायक घटना घडतील. प्रकृती उत्तम राहील. आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल. आर्थिक लाभ होतील. कामाच्या ठिकाणी सर्वांचे सहकार्य लाभेल. प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान स्वीकारून त्यात यशस्वी व्हाल.
- तूळ: आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण बौद्धिक कामे आणि चर्चा यांत अग्रस्थानी राहाल. आपली कल्पनाशक्ती आणि सृजनशक्ती यांतील प्रगती समाधान देईल. विनाकारण वाद-विवाद आणि चर्चेत पडू नका. आरोग्याच्या बाबतीत पचनक्रिये संबंधी तक्रारी राहतील. प्रिय व्यक्तीचा सहवास सुखदायक ठरेल.
- वृश्चिक: आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जाणवेल. वडीलधार्यांशी पटणार नाही आणि त्यामुळं मनाला वेदना होतील. आईची प्रकृती बिघडू शकते. आर्थिक नुकसान आणि सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होईल. जमीन, वाहन इत्यादींचे सौदे किंवा कागदपत्रे करण्या विषयी जपून राहावं. स्त्रीवर्ग व पाण्यापासून नुकसानीची शक्यता आहे.
- धनू: आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज एखाद्या गूढ व रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण होईल. नवीन कार्यारंभास आजचा दिवस अनुकूल आहे. मित्र आणि आप्तेष्टांच्या आगमनाने घरात आनंद राहील. हाती घेतलेली कामे यशस्वी होतील. जवळचा प्रवास घडेल. धनलाभ संभवतो. लहान भावंडांशी चांगले सुत जमेल. मान - प्रतिष्ठा वाढेल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडू शकेल.
- मकर : आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपल्या कृतीवर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. शेअर - सट्टा बाजार यात गुंतवणूक कराल. आर्थिक लाभ होईल. प्रकृतीच्या काही तक्रारी उदभवतील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्यानं लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करावं लागेल.
- कुंभ : आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपण शारीरिक आणि मानसिकदृष्टया प्रफुल्लित राहाल. नातलग, मित्र, कुटुंबीय यांच्यासह घरात उत्सवाचे वातावरण राहील. स्वादिष्ट भोजन मिळेल. पर्यटनाचा बेत आखाल. आर्थिकदृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे. गूढ विषयांची गोडी लागेल.
- मीन : आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक करताना खूप दक्ष राहावं लागेल. एकाग्रता कमी असल्यानं आपण बेचैन राहाल. मंगल कार्यावर खर्च होईल. मित्र-स्वकीयांशी मतभेद होतील. लालसा नुकसान करेल. जामीन किंवा कोर्ट-कचेरी प्रकरणात न पडणं अधिक चांगले ठरेल.