महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

18 March Horoscope: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 'या' राशीच्या व्यक्तींना होऊ शकतो अचानक धनलाभ - 18 March Horoscope

18 March Horoscope : कोणत्या राशींसाठी आजचा दिवस शुभ, ग्रहांची चाल कशी राहील, आजचा दिवस कसा राहील, तुमच्या नशिबाचे तारे काय सांगतात, जाणून घ्या या दैनिक राशीभविष्य...

18 March Horoscope: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 'या' राशीच्या व्यक्तींना होऊ शकतो अचानक धनलाभ
18 March Horoscope: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 'या' राशीच्या व्यक्तींना होऊ शकतो अचानक धनलाभ

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 18, 2024, 9:22 AM IST

मेष : आज सोमवारी 18 मार्च रोजी चंद्र मिथुन राशीत आहे. तुमच्या राशीत चंद्र तिसऱ्या भावात असेल. आज तुमचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. आज तुम्हाला नवीन काम करण्याची प्रेरणा मिळेल. तुम्ही काही नवीन कामही सुरु करु शकाल. आज तुमचे विचार लवकर बदलतील. यामुळं तुमचा एक प्रकारचा गोंधळ होऊ शकतो. आज तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात तुमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या कठोर वागणुकीला सामोरं जावं लागेल. काही विशिष्ट कामासाठी तुम्ही पुढील प्रयत्न कराल. प्रवासाची शक्यता आहे. महिलांना आज आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तथापि, आरोग्याच्या दृष्टीकोनातून वेळ चांगला आहे.

वृषभ : आज सोमवारी 18 मार्च रोजी चंद्र मिथुन राशीत आहे. तुमच्या राशीत चंद्र दुसऱ्या भावात असेल. गोंधळलेल्या मानसिकतेमुळं महत्त्वाच्या संधी गमावल्या जाऊ शकतात. नवीन काम सुरु करण्यासाठी दिवस अनुकूल नाही. आज कामाच्या ठिकाणी तुम्ही फक्त तुमच्या स्वतःच्या व्यवसायात लक्ष घालावं. इतरांच्या कामात अनावश्यक ढवळाढवळ केल्यानं तुमची बदनामी होऊ शकते. हट्टी स्वभावामुळं कोणाशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. दुपारनंतर तुम्ही तुमच्या गोड बोलण्यानं कोणालाही आकर्षित करु शकाल. तुमच्या कुटुंबात शांतता नांदेल. आर्थिक लाभ मिळू शकाल. विद्यार्थ्यांना यश संपादन करता येईल.

मिथुन : आज सोमवारी 18 मार्च रोजी चंद्र मिथुन राशीत आहे. तुमच्या राशीच्या चंद्र पहिल्या भावात असेल. आज तुम्ही उत्साही आणि ताजेतवानं राहाल. चांगले कपडे आणि दागिने खरेदी होण्याची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजन मिळेल. नातेवाईकांसोबत तुमचा दिवस आनंदात जाईल. वैवाहिक जीवनात समाधान व शांती प्राप्त करु शकाल. आर्थिक लाभ आणि योजना पूर्ण होण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. तुम्हाला नवीन लक्ष्य देखील मिळू शकतं.

कर्क : आज सोमवारी 18 मार्च रोजी चंद्र मिथुन राशीत आहे. तुमच्या राशीत चंद्र बाराव्या भावात असेल. आज तुम्हाला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ वाटेल. तुम्ही कोणत्याही एका निर्णयापर्यंत पोहोचू शकणार नाही. गोंधळामुळं मन कुठेच एकाग्र होणार नाही. याचा परिणाम तुमच्या कामावर होईल. नातेवाईकांशी मतभेद होऊ शकतात. कौटुंबिक बाबींवर पैसा खर्च होईल. आज भांडणापासून दूर राहा. जर तुमचा कोणाशी वाद झाला असेल तर ताबडतोब त्याची माफी मागा, अन्यथा तुम्हाला भविष्यात समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. विचार न करता वागल्यानं नुकसान होईल. आरोग्य आणि धनाचं नुकसान होऊ शकतं.

सिंह : आज सोमवारी 18 मार्च रोजी चंद्र मिथुन राशीत आहे. तुमच्या राशीत चंद्र अकराव्या भावात असेल. आज तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही मनानं खंबीर असलं पाहिजे, अन्यथा तुमच्या वाट्याला आलेल्या संधीही वाया जाऊ शकतात. मित्रांच्या भेटीमुळं तुम्हाला लाभ मिळतील. तुम्हाला तुमच्या मोठ्यांचा आशीर्वाद मिळू शकेल. घरामध्ये शुभ कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल. व्यवसायात चांगलं यश प्राप्त करु शकाल. नोकरदार लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. प्रवासाचीही शक्यता आहे. नोकरीमध्ये काही नवीन काम मिळू शकते. आज व्यवसायात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल.

कन्या : आज सोमवारी 18 मार्च रोजी चंद्र मिथुन राशीत आहे. तुमच्या राशीत चंद्र दहाव्या भावात असेल. नवीन काम सुरु करण्यासाठी तुम्ही तयार केलेल्या योजना तुम्ही सहज पूर्ण करु शकाल. वडिलांशी जवळीक वाढेल. आदर वाढेल. सरकारी कामात यश मिळेल. आरोग्य चांगलं राहील. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. पैसे किंवा व्यवसायाच्या वसुलीच्या उद्देशानं प्रवास होण्याची शक्यता आहे. परदेशाशी संबंधित कामात यश संपादन करु शकाल. परदेशात राहणाऱ्या तुमच्या प्रियजनांच्या बातम्या तुम्हाला मिळतील. तुमचं आरोग्य बिघडेल. मुलांच्या आरोग्याची चिंता राहील.

तूळ : आज सोमवारी 18 मार्च रोजी चंद्र मिथुन राशीत आहे. तुमच्या राशीत नवव्या भावात चंद्र असेल. व्यापार क्षेत्रात लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. लांबचा प्रवास किंवा धार्मिक स्थळाला भेट देण्याचं नियोजन होऊ शकतं. लेखन आणि बौद्धिक क्षेत्रात तुम्ही अधिक सक्रिय व्हाल. परदेशातील मित्र आणि प्रियजनांकडून वार्ता मिळाल्यानं आनंद होईल. दुपारनंतर शारीरिक अस्वस्थता जाणवेल. यामुळं तुमच्या कामाचा वेग कमी होऊ शकतो. जोडीदाराशी समन्वय ठेवावा लागेल. प्रेम जीवनात असंतोष राहील.

वृश्चिक : आज सोमवारी 18 मार्च रोजी चंद्र मिथुन राशीत आहे. तुमच्या राशीत चंद्र आठव्या भावात असेल. आज तुमच्या स्वभावावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी कोणाशी विनाकारण वाद होऊ शकतो. आज कोणतंही नवीन काम सुरु करू नका. आरोग्य बिघडण्याची शक्यता असल्यानं खाण्याच्या सवयींची काळजी घ्या. बाहेरच्या खाण्यापिण्यात बेफिकीर राहू नका. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. धार्मिक कार्य किंवा ध्यानासाठी वेळ चांगला आहे. विचार आणि चिंतनानं तुम्ही तुमचं मन शांत करू शकाल. तुमची कोणी नवीन भेट घेऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी वेळ मध्यम फलदायी आहे.

धनु : आज सोमवारी 18 मार्च रोजी चंद्र मिथुन राशीत आहे. तुमच्या राशीत चंद्र सातव्या भावात असेल. आज तुम्ही स्वादिष्ट भोजन, छान कपडे, प्रवास आणि पार्ट्यांचा आनंद घेऊ शकाल. भरपूर मनोरंजनाचा आनंद मिळेल. मित्रांकडून विशेष आकर्षण अनुभवाल. तुमच्या प्रिय व्यक्तीला भेटल्यानंतर तुम्हाला रोमांच जाणवेल. वैवाहिक जीवन खूप आनंदी असेल. आज नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. तर्क आणि बौद्धिक विचारांची देवाणघेवाण करु शकाल. व्यवसायात सहभागातून लाभ मिळेल. आरोग्याच्या दृष्टीकोनातून वेळ चांगला आहे.

मकर : आज सोमवारी 18 मार्च रोजी चंद्र मिथुन राशीत आहे. तुमच्या राशीत चंद्र सहाव्या भावात असेल. तुमच्या व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न कराल. पैशाच्या व्यवहारात सहजता येईल. तथापि, आपण कोणालाही पैसे देणं टाळावं. घरात शांती आणि आनंदाचं वातावरण राहील. महत्त्वाच्या कामांसाठी पैसा खर्च होईल. नोकरीत सहकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. परदेश व्यापार वाढेल. शत्रूंवर विजय मिळेल. आरोग्य चांगलं राहील. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी सरप्राईज प्लॅन करु शकता. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे.

कुंभ : आज सोमवारी 18 मार्च रोजी चंद्र मिथुन राशीत आहे. तुमच्या राशीतून चंद्र पाचव्या भावात असेल. आज कोणतंही नवीन काम सुरु करु नका. घाईघाईनं काम केल्यानं तुमचं नुकसान होऊ शकतं. आज कामाच्या ठिकाणी तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. महिलांना बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. प्रवास पुढं ढकलणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मुलांची चिंता राहील. दुपारनंतर सर्जनशील कार्यात तुमची आवड राहील. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी मिळेल. आनुषंगिक खर्चाची शक्यता आहे. पोटाशी संबंधित आजार होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांशी वाद टाळा.

मीन : आज सोमवारी 18 मार्च रोजी चंद्र मिथुन राशीत आहे. तुमच्या राशीत चंद्र चौथ्या भावात असेल. अप्रिय घटनांमुळं आजचा दिवस उत्साहवर्धक राहणार नाही. घरातील सदस्यांशी वाद होईल. आईच्या तब्येतीबद्दल तुम्ही चिंतेत असाल. एखाद्या गोष्टीबद्दल मन चिंतेत राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतं. यामुळं तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होईल. महिलांशी बोलताना काळजी घ्या. धनहानी होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना एखाद्या गोष्टीची चिंता असेल. कायमस्वरुपी मालमत्ता आणि वाहनं इत्यादींच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा.

हेही वाचा :

  1. Today Panchang : 16 मार्च 2024 पंचांग ; काय आहे आजचा शुभमुहूर्त, योग आणि राहूकाळ
  2. 17th March Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींना आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या लाभदायक

ABOUT THE AUTHOR

...view details