महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"...तर सिव्हिल वार होईल"; कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचा दावा काय? - Lok Sabha result - LOK SABHA RESULT

Yashomati Thakur : मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात अति दुर्गम भागात वसलेल्या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. पिण्यासाठी देखील नागरिकांना पाणी मिळत नाही अशी अत्यंत दयनीय अवस्था असताना देखील पालकमंत्र्यांनी या गावांकडे दुर्लक्ष केले असा आरोप माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat MH Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 2, 2024, 10:18 PM IST

अमरावती Yashomati Thakur : महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात कल मतमोजणी दरम्यान दिसून येईल. चार तारखेला अमरावती चा खासदार हा पंजावर निवडणूक लढवणारा महाविकास आघाडीचा निवडून येतो आहे कोणाला काय बोलायचं ते बोलू द्या, जर असा निकाल लागला नाही तर सिव्हिल वार होईल असा इशारा माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

घाबरुन दिल्या जात आहेत कल : महाविकास आघाडीपेक्षा महायुती बाजी मारेल अशा स्वरुपाचे जे काही कल येत आहेत, खरंतर माध्यमातील काही मंडळींकडून घाबरुन दिल्या जात असल्याचं आम्हाला वाटत आहे असं देखील आमदार यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय. 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यापूर्वी जो काही एक्झिट पोल समोर येतो तो एक्झिट पोल 100 नव्हे तर 200 टक्के मॅनेज असल्याचं आमदार यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय.

मेळघाटात कृत्रिम पाणीटंचाई :मेळघाटात अनेक ठिकाणी हॅन्ड पंप बंद आहे. या भागात वीज पुरवठा देखील सुरळीत नाही. यामुळे पाणीपुरवठा योजनेमध्ये. मेळघाटात पाणीटंचाईचे काही विषय असे आहेत ते कृत्रिम निर्माण केले आहेत. सरकार आणि अधिकारी हलगर्जी असल्यामुळे मेळघाटात कुठलेच काम नाहीत . काही भागात नैसर्गिक रित्या पाणीटंचाई आहे जर ज्या मोठ्या योजना मंजूर केल्या त्या पूर्णत्वास नेल्या तर मेळघाटात पाणीटंचाईची समस्या सुटेल असे देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या.

दुष्काळी भागाची पाहणी : मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात अतिदुर्गम भागात वसलेल्या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. पिण्यासाठी देखील नागरिकांना पाणी मिळत नाही अशी दयनीय अवस्था असताना देखील पालकमंत्र्यांनी या गावांकडं दुर्लक्ष केले असा आरोप माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलाय. काँग्रेसच्या वतीनं अमरावती विभाग दुष्काळ पाहणी दौऱ्याच्या प्रमुख म्हणून त्यांनी चिखलदरा तालुक्यात पाहणी दौरा केला. राज्यात ज्या भागात दुष्काळी परिस्थिती आहे, अशा सर्व महसूल विभागात काँग्रेसच्या वतीनं दुष्काळ दौरा केला जातोय. अमरावती विभाग दुष्काळ दौरा प्रमुख म्हणून यशोमती ठाकूर यांनी चिखलदरा तालुक्यातील भगदरी खडीमल चुनखडी तारु बांदा या गावांमध्ये दुष्काळ परिस्थितीची पाहणी केली. या गावातील दुष्काळग्रस्त आदिवासी बांधवांशी संवाद साधून त्यांच्याकडून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी या परिसरात असलेल्या व्याघ्र प्रकल्पामुळं अनेक पाणीपुरवठा योजनांना परवानगी मिळू शकली नाही, तसंच पाण्याचे स्त्रोत खूप खोलवर गेल्यामुळं खडीमल आणि तारू बांदा या गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे वास्तव समोर आलं. या संदर्भात स्थानिक नागरिकांची चर्चा करून त्यांच्या विविध समस्या समजून व समस्या शासन दरबारी मांडण्यासंदर्भात आपण नक्कीच कारवाई करु असं आश्वासन यशोमती ठाकूर यांनी यावेळी दिलं.

हेही वाचा :

  1. खासदार म्हणून निवडून आल्यास करणार "ही" पाच कामे; मविआचे उमेदवार बळवंत वानखडे यांची मुलाखत - Lok Sabha Election 2024
  2. अमरावती लोकसभेचा कधी लागणार निकाल? मतमोजणी केंद्र सज्ज - Lok Sabha Election 2024
  3. परतवाडा येथील सदर बाजारात भीषण आग, आगीत लाखोंचं नुकसान - Patrwada Sadar Bazar Fire

ABOUT THE AUTHOR

...view details