महाराष्ट्र

maharashtra

आधी विखे अन् आता चव्हाणही गेले; 'वंचित'ची वेगळीच व्यथा, पडला 'हा' मोठा प्रश्न

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 7:51 AM IST

Anjali Ambedkar On Ashok Chavhan : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan Resigns) हे काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत. त्यांनी सोमवारी आमदारकीसह काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा दिलाय. मात्र ,वंचित बहुजन आघाडीची वेगळीच व्यथा आहे. आता महाविकास आघाडीत कोणाशी संपर्क साधायचा? असा सवाल 'वंचित'च्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापिका अंजली आंबेडकर यांनी उपस्थित केलाय.

Anjali Ambedkar On Ashok Chavhan
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि अंजली आंबेडकर

मुंबई Anjali Ambedkar On Ashok Chavhan : लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या काही महिन्याआधी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता काँग्रेस पक्षालाही खिंडार पडताना दिसतंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan Resigns) यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसंच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय. त्यांच्या या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. यावरुन अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

अंजली आंबेडकर यांनी उपस्थित केला सवाल : अशोक चव्हाण हे काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर यांनी सवाल उपस्थित करत व्यथा मांडलीय. "काँग्रेस आम्ही आता कोणाशी बोलावं? तुमचे नेमलेले नेते भाजपाच्या वाटेवर जात आहेत. त्यामुळं आता महाविकास आघाडीत समन्वय साधताना आम्ही कोणाशी बोलावं? हा प्रश्न पडला असून कृपया याचं उत्तर द्यावं", अशी मागणी करत काही प्रश्नही अंजली आंबेडकर यांनी काँग्रेसला विचारलेत.

आधी विखे पाटील गेले आता चव्हाण : 2019 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने राधाकृष्ण विखे पाटील यांना वंचित बहुजन आघाडीशी युतीच्या चर्चेसाठी नेमलं होतं. मात्र, निवडणुकीपूर्वी तेच भाजपामध्ये गेले आणि 'वंचित'नं कुणाशी बोलावं हा प्रश्न निर्माण झाला होता. आता 2024 च्या निवडणुकीसाठी अशोक चव्हाण यांना काँग्रेसनं केवळ चर्चेसाठीच नव्हे तर महाविकास आघाडीसोबत काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून नेमलं होतं. आता अशोक चव्हाणसुद्धा भाजपामध्ये जाणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काँग्रेस नेते भाजपाकडं जात असल्यानं, आघाडीच्या चर्चा करण्यासाठी आम्ही बोलावं तरी कोणाशी? हे आता काँग्रेसनं सांगावं, असं अंजली आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा -

  1. "भाजपानं कोणत्याही पक्षाला फोडलं तरी...", प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
  2. शिंदे गटाच्या नेत्यांचं ठाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी 'घर छोडो' आंदोलन, प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड
  3. महाविकास आघाडीच्या जागा वाटपानंतर 'वंचित'ची भूमिका ठरवू - प्रकाश आंबेडकर

ABOUT THE AUTHOR

...view details