महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

'या' आठवड्यात 5 राशींचे चमकेल भाग्य; मिळेल चांगली बातमी, वाचा साप्ताहिक राशीभविष्य - WEEKLY HOROSCOPE

मेष ते मीन राशींसाठी नेमका कसा असणार नोव्हेंबरचा आठवडा, जाणून घेण्यासाठी वाचा साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2024, 2:54 AM IST

मेष (Aries) : हा आठवडा आपणास मिश्र फायदा देणारा आहे. आठवड्याच्या सुरूवातीस आपण कामात व्यस्त राहाल. आपल्यावर अचानकपणे कामाचा अतिरिक्त भार येऊ शकतो. ती पूर्ण करण्यासाठी आपणास अधिक परिश्रम आणि प्रयत्न करावे लागतील. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हा आठवडा आव्हानात्मक असू शकतो. व्यावसायिकांना आपल्या स्पर्धकांशी कडवी झुंज द्यावी लागण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात आरोग्य काहीसे नरम-गरम राहण्याची शक्यता असल्यानं आपणास आपल्या दिनचर्येवर आणि आहारावर लक्ष ठेवावं लागेल. परदेशात कारकीर्द घडवण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करत असणाऱ्यांना काही अडचणी येऊ शकतात. प्रणयी जीवनात घाई करू नका. तसेच भावनेच्या भरात असे कोणतेही पाऊल उचलू नका, जेणे करून आपणास खूप त्रास होऊ शकेल. दांपत्य जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराच्या गरजा दुर्लक्षित करू नका. ह्या आठवड्यात आपणास सावध राहावं लागेल. आपल्या कार्यात सर्तक राहावं लागेल.

वृषभ (Taurus) : हा आठवडा विविधतेने भरलेला आहे. व्यापारी वर्गास त्यांच्या व्यवसायात चढ-उतारांना सामोरे जावं लागू शकतं. आठवड्याच्या मध्यास अचानकपणे एखादा प्रवास करावा लागू शकतो. त्यामुळं आपणास कार्यक्षेत्रापासून दूर राहावे लागेल. आपण जर आपल्या कारकिर्दीसाठी दृढपणे प्रयत्न करत असाल तर आपले लक्ष गाठण्यासाठी आपणास अजून थोडी वाट पाहावी लागू शकते. आठवड्याच्या अखेरीस नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपले सहकारी आणि वरिष्ठ ह्यांच्याशी मिळून-मिसळून कामे करावी लागतील. प्रवासा दरम्यान आपल्या सामानाची आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. परीक्षा-स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना परिश्रम करूनच यशस्वी होता येईल. प्रणयी जीवनातील गैरसमज एखाद्या महिला मित्राच्या मध्यस्थीने दूर करता येतील, परंतु विश्वास पुनर्स्थापित होण्यास थोडा वेळ लागू शकतो.

मिथुन (Gemini) : आठवड्याच्या सुरूवातीस एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची मदत आपणास होण्याचे संकेत आहेत. त्यानंतर दीर्घ काळापासून स्थगित असलेले एखादे मोठे काम पूर्ण होऊ शकते. आपणास सत्ता आणि शासनाशी संबंधित व्यक्तींचे पूर्ण सहकार्य मिळेल. आठवड्याच्या मध्यास कार्यक्षेत्री आपल्यावर जळणाऱ्या लोकांपासून आपणास सावध राहावं लागेल. जमीन किंवा घराशी संबंधित वाद संपुष्टात येतील. आपण जर भागीदारीत व्यवसाय करत असाल तर आपणास आर्थिक बाबींची स्पष्टता करूनच वाटचाल करावी लागेल. परीक्षा-स्पर्धेची तयारी करत असणाऱ्यांना खुशखबर मिळू शकते. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी आपणास शुभचिंतकांचा सल्ला घ्यावा लागेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. आपणास प्रेमिकेच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. दाम्पत्य जीवन सुखद होईल.

कर्क (Cancer) : आठवड्याच्या सुरूवातीस आपणास एखादे मोठे यश मिळण्याची संभावना आहे. त्यामुळं आपल्या धनसाठात भरघोस वाढ होऊ शकेल. ह्या यशाने उत्साहित होऊन अहंकारीत होणं टाळावं. कोणत्याही जोखीम असलेल्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करणं टाळा, अन्यथा भविष्यात आपणास मोठे नुकसान सोसावे लागू शकते. ह्या आठवड्यात आपली पदोन्नती किंवा अपेक्षित ठिकाणी बदली होण्याची कामना पूर्ण होऊ शकते. कार्यक्षेत्री वरिष्ठ आणि कनिष्ठ आपल्या कामगिरीची प्रशंसा करतील. जमीन-घर ह्यांच्या खरेदी-विक्रीत आपणास लाभ होईल. आपण जेव्हा आपल्या कुटुंबाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेणार असाल तेव्हा आपणास आई-वडिलांचे पूर्ण सहकार्य आणि समर्थन प्राप्त होईल. आपण जर परदेशात कारकीर्द घडविण्याचा किंवा व्यापार करण्याचा विचार करत असाल तर येणाऱ्या अडचणींचा सामना आपणास करावा लागेल. आठवड्याच्या अखेरीस आपण मित्र किंवा कुटुंबियांसह एखाद्या सहलीचा कार्यक्रम आखू शकता. प्रेमसंबंध दृढ होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल.

सिंह (Leo): ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीवर आणि संबंधांवर लक्ष ठेवावं लागेल. आपली प्रकृती बिघडल्यास त्याचा प्रभाव आपल्या कामगिरीवर होऊ शकतो. एखादी मोठी संधी हातातून निसटून जाण्याचा धोका असू शकतो. एखाद्या लहानशा चुकीमुळं आपली प्रतिमा मलीन होऊ शकते. आपणास विरोधकांपासून सावध राहावं लागेल. आठवड्याच्या उत्तरार्धात जमीन-घर ह्यांच्याशी संबंधित एखादी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कार्यक्षेत्री सतर्क राहावं लागेल. प्रणयी जीवनात विचारपूर्वक पाऊल उचलावे. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराच्या भावनांचा आदर राखावा. व्यक्तिगत जीवनात घाईघाई किंवा आवश्यकतेहून जास्त हस्तक्षेप केल्यास आपले संबंध बिघडू शकतात.

कन्या (Virgo): हा आठवडा आपल्यासाठी शुभ फलदायी आणि सौभाग्यदायी आहे. आठवड्याच्या सुरूवातीस आपण पूर्वी केलेल्या एखाद्या कामामुळं आपणास सन्मानित केलं जाऊ शकते. तसेच आपल्यावर एखादी मोठी जबाबदारी सुद्धा सोपविण्यात येऊ शकते. बाजारातील तेजीचा लाभ आपण घेऊ शकता. त्यामुळं आपली प्रतिष्ठा सुद्धा उंचावेल. हा आठवडा व्यापारासाठी सुद्धा अनुकूल आहे. आपण जर दीर्घ काळापासून व्यापार विस्तार करण्याचा विचार करत असाल तर ह्या आठवड्यात आपली हि इच्छा पूर्ण होऊ शकते. ज्या व्यक्ती नोकरीत बदल करू इच्छितात त्यांना आठवड्याच्या अखेरीस एखादी मोठी ऑफर मिळू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात सुख-सोयींशी संबंधित एखादी मोठी वस्तू आपण खरेदी करू शकाल. त्यामुळं आपल्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमसंबंध प्रगल्भ होतील. आपण आपल्या प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकता.

तूळ (Libra): ह्या आठवड्याची सुरूवात आपल्यासाठी अत्यंत धावपळीची असू शकते. एखाद्या वादामुळं आपणास कोर्टाच्या चकरा माराव्या लागू शकतात, परंतु हा वाद कोर्टाच्या बाहेर सामंजस्याने सोडविणे हितावह होईल. आठवड्याच्या सुरूवातीस लहान भावंडांशी झालेल्या वादामुळं आपणास मानसिक त्रास होऊ शकतो. ह्या दरम्यान बोलताना आपणास आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावं लागेल, जेणे करून एखादा वाद चिघळल्याचे दुःखद परिणाम होणार नाहीत. कार्यक्षेत्री लोकांच्या लहान-सहान गोष्टींवर प्रतिक्रिया देण्याऐवजी त्याकडं दुर्लक्ष करणं हितावह होईल. आठवड्याचा उत्तरार्धात कारकीर्द आणि व्यवसायाशी संबंधित प्रवास करावा लागू शकतो. प्रवास सुखद झाला तरी अपेक्षेहून थोडा कमी लाभदायी होऊ शकतो. आपण जर कोणासमोर आपले प्रेम व्यक्त करू इच्छित असाल तर घाई करू नका. योग्य वेळ आली की ते व्यक्त करा, अन्यथा आपण झिडकारले जाऊ शकता. जे पूर्वीपासून प्रणयी जीवन जगत आहेत त्यांचे प्रेमसंबंध प्रगल्भ होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल.

वृश्चिक (Scorpio) : आठवड्याच्या सुरूवातीस आपण पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे आणि परिश्रमांचे सुखद परिणाम बघण्याची संधी मिळू शकते. ह्या आठवड्यात कारकीर्द किंवा व्यवसायाशी संबंधित एखादी चांगली बातमी सुद्धा मिळू शकते. असं असले तरी कार्यक्षेत्री आपणास आपल्या विरोधकापासून सतर्क राहावं लागेल, अन्यथा ते आपल्या कामात खोडा घालू शकतील. आठवड्याच्या उत्तरार्धात विद्यार्थ्यांना अभ्यासाचा उबग येऊ शकतो. ते जर एखाद्या परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असले तर त्यांना कठोर परिश्रम करूनच अपेक्षित परिणाम मिळू शकेल. एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळं आपल्या प्रणयी जीवनात कटुता निर्माण होऊ शकते. अशावेळी एखादा वाद हा संवादानं सोडविण्याचा प्रयत्न करावा. आठवड्याच्या अखेरीस आपण आपल्या वैवाहिक जोडीदारासह एखाद्या धार्मिक ठिकाणी प्रवासास जाण्याचा बेत आखू शकता. ह्या प्रवासाने आपल्या नात्यात शांतता आणि समरसता असल्याचं जाणवेल. कुटुंबातील एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीची प्रकृती आपल्या काळजीचे कारण होऊ शकते. तेव्हा त्यांची काळजी घ्या.

धनु (Sagittarius) : आपण वेळ आणि ऊर्जेचे योग्य नियोजन करण्यात यशस्वी झालात तर हा आठवडा आपणास यश आणि लाभ प्राप्त करून देणारा होऊ शकतो. ह्या दरम्यान आपल्या संपर्कात प्रतिष्ठित व्यक्तींचे आगमन होईल आणि त्यांच्या मदतीनं आपण लाभदायी योजनेत सहभागी होऊ शकाल. नोकरी करणाऱ्या महिलांना सुद्धा एखादे महत्वाचे यश मिळू शकते. त्यामुळं कुटुंबात त्यांचा सन्मान वाढू शकतो. विवाहेच्छुकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. प्रेमसंबंध दृढ होऊ शकतात. कदाचित आपल्या प्रेमसंबंधाचा स्वीकार आपले आई-वडील करून आपल्या विवाहासाठी आशीर्वाद सुद्धा देतील. आठवड्याच्या उत्तरार्धात मातेची प्रकृती आपल्या काळजीचे कारण होऊ शकते. तेव्हा तिच्या प्रकृतीची काळजी घ्या. वाहन सावकाश चालवा.

मकर (Capricorn): हा आठवडा आपल्यासाठी काहीसा आव्हानात्मक आणि अडथळ्यांचा असू शकतो. आपणास आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जास्त धावपळ आणि परिश्रम करावं लागू शकतं. घराची दुरुस्ती आणि इतर कार्यासाठी आपणास अधिक व्यस्त राहावं लागू शकतं.आपण जर नोकरीच्या किंवा रोजगाराच्या प्रतीक्षेत असाल तर आपणास अजून काही दिवस धीर धरावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांवर सुद्धा कामाचा भार वाढू शकतो. वैवाहिक जोडीदाराशी असलेल्या मतभेदांचे रूपांतर मनभेदात होऊ देऊ नका. घरगुती समस्यांचं निराकरण संवादानं करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या गैरसमजाचा प्रभाव आपल्या प्रणयी जीवनावर होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीची ढासळलेली प्रकृती आपल्या चिंतेस कारणीभूत ठरू शकते. आपली प्रकृती चांगली राहावी म्हणून आपण आपला आहार, संवयी आणि व्यायामावर लक्ष केंद्रित करावं. वेळोवेळी विश्रांती घ्या. आपली मानसिक स्थिती संतुलित ठेवण्यावर लक्ष केंद्रित करा.

कुंभ (Aquarius) : ह्या आठवड्यात आपणास आळस आणि अहंकार झटकून टाकावा लागेल. आजचे काम उद्यावर ढकलण्याची वृत्ती सोडावी लागेल, अन्यथा आपलेच नुकसान होऊ शकते. जर जमीन किंवा घराशी संबंधित एखादा वाद आपसात बोलणी करून संपुष्टात आणता येत असेल तर तसे करावे. नुकसान टाळण्यासाठी कोर्टाची पायरी शक्यतो चढू नये. आठवड्याचा मध्य व्यापारास विशेष अनुकूल नाही होऊ शकत. आपणास आर्थिक देवाण-घेवाण करताना सतर्क राहावे लागेल. एखाद्या योजनेत किंवा व्यवसायात आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वकच करावी, अन्यथा नंतर नुकसान सोसावे लागू शकते. प्रवासा दरम्यान आपल्या सामानाची आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रेमसंबंधात सतर्क राहावे. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराच्या गरजांकडं लक्ष द्यावं.

मीन (Pisces) : हा आठवडा आपणास कठोर परिश्रम आणि प्रयत्नानंतरच अपेक्षित यश देणारा आहे. आपणास आपल्या कामात स्वतःला समर्पित करावं लागेल. इतरांवर अवलंबून राहू नये. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्राप्तीचे नवीन स्रोत शोधण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आठवड्याच्या सुरूवातीस व्यवसायात थोडी मंदी येऊ शकते, परंतु उत्तरार्धात अपेक्षित लाभ मिळू शकेल. बाजारातील तेजीचा लाभ घेण्यात आपण यशस्वी व्हाल. आपल्या संचित धनात वाढ होईल. प्रेमसंबंध दृढ होतील आपला प्रेमिकेशी उत्तम समन्वय साधला जाईल. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी आपणास आपल्या प्रकृतीची आणि संबंधांची काळजी घ्यावी लागेल. आठवड्याच्या सुरूवातीस आपणास ऋतुजन्य आजार किंवा जुने विकार उफाळून येण्याची संभावना असल्याने आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी.

हेही वाचा -

साईंच्या मंदिरात लक्ष्मी कुबेर पूजन, पाच कोटींच्या आभूषणांनी साईंना मढवले

ABOUT THE AUTHOR

...view details