महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

अदानीचा पीएम सोबत फोटो म्हणजे त्यांची पार्टनरशिप का? घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया - Wadettiwar On Ghatkopar Accident

Wadettiwar On Ghatkopar Accident : सोमवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं घाटकोपरमध्ये हायवेजवळ असलेल्या पेट्रोलपंपावरील होर्डिंग्ज कोसळलं. यावरुन आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी आणि अदानी यांचा एकत्र फोटो म्हणजे ते दोघे पार्टनर का, असा सवाल त्यांनी विचारलाय.

Vijay Wadettiwar
विजय वडेट्टीवार (MH Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 14, 2024, 7:25 PM IST

विजय वडेट्टीवार (Mumbai Reporter)

मुंबई Wadettiwar On Ghatkopar Accident: मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये (Ghatkopar Hoarding Collapse) चौदा जणांना आपला जीव गमवावा लागला. जाहिरात कंपनीचे मालक भावेश भिंडे यांच्यावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल झाला आहे. होर्डिंग दुर्घटनेनंतर मात्र, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत.

राम कदम यांची ठाकरेंवर टीका... : फरार भावेश भिंडे याच्यासोबतचा उद्धव ठाकरे यांचा फोटो ट्विट करून, भाजपाचे आमदार राम कदम यांनी ठाकरेंवर टीका केलीय. तर अदानींचा पीएम सोबत फोटो म्हणजे त्यांच्यात पार्टनरशिप काय? असं म्हणत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाजपावर पलटवार केलाय.


अदानींबरोबर फोटो म्हणजे पार्टनरशिप? : घाटकोपर येथील या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच होर्डिंगला परवानगी दिल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. फरार असलेला जाहिरात संस्थेचा मालक मुख्य आरोपी भावेश भिंडे आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो ट्विट करत भाजपा आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, उद्या जर अदानीबरोबर पीएमचा फोटो आला, म्हणजे पीएमची त्यांच्यासोबत पार्टनरशिप आहे काय?, अशा प्रकारच्या बोलण्याला काय अर्थ असतो का, कोणी कोणासोबतही फोटो काढतो, असं वडेट्टीवार म्हणाले.

दुर्घटनेची जबाबदारी बीएमसी प्रशासनाची : विजय वडेट्टीवार यांनी घाटकोपर येथे जाऊन दुर्घटनेची पाहणी केली. या घटनेची पूर्ण जबाबदारी मुंबई महापालिका प्रशासनाची आहे. व्हीआयपींमुळं रस्ते जाम झाले होते. पाच लाख रुपये देऊन तुम्ही मोकळे होऊ शकत नाही. उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सर्वच होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे. 120 फूट होर्डिंग कुठल्याच नियमात बसत नाही. याकडं दुर्लक्ष झाल्यामुळं निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. फक्त भेटी देऊन काही होणार नाही, या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जबाबदारी निश्चित केली पाहिजे. मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई येथील होर्डिंगचं ऑडिट करण्यात यावं. "ज्याला चंदा देतो, तो धंदा देतो" असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना विजय वडेट्टीवार यांनी टोला लगावला.

हेही वाचा -

  1. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : उद्योगपती आनंद महिंद्रांनी व्यक्त केलं दु:ख, म्हणाले मुख्यमंत्र्यांनी . . . - Ghatkopar Hoarding Collapse
  2. लोकसभा निवडणूक 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणशीतून दाखल केला नामांकन अर्ज - PM Narendra Modi Nomination
  3. बिहारमध्ये भाजपाला यश मिळवून देणाऱ्या सुशील मोदी यांचं कर्करोगानं निधन, पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली - Sushil Modi Passed Away

ABOUT THE AUTHOR

...view details