महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

Vijay Shivtare vs Ajit Pawar: 'लक्षात घ्या, दादाच ठरवतात पुरंदरचा विजय'; पुण्यात शिवतारेंच्या विरोधात बॅनरबाजी - Vijay Shivtare vs Ajit Pawar

Vijay Shivtare vs Ajit Pawar : बारामती मतदारसंघात शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटले असून त्यांनी थेट अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय. त्यांनंतर आता अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आलीय.

Vijay Shivtare vs Ajit Pawar: 'लक्षात घ्या, दादाच ठरवतात पुरंदरचा विजय'; पुण्यात शिवतारेंच्या विरोधात बॅनरबाजी
Vijay Shivtare vs Ajit Pawar: 'लक्षात घ्या, दादाच ठरवतात पुरंदरचा विजय'; पुण्यात शिवतारेंच्या विरोधात बॅनरबाजी

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 16, 2024, 10:57 AM IST

पुणे Vijay Shivtare vs Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (शिंदे गट) नेते विजय शिवतारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार यांच्यात राजकीय संघर्ष उफाळला आहे. बारामती मतदारसंघातून अपक्ष लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं देखील शिवतारे यांनी जाहीर केलंय. यामुळं महायुतीत बिघाडी पाहायला मिळत आहे. अशातच पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून विजय शिवतारे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलीय.

दादाच ठरवतात पुरंदरचा विजय : पुण्यातील कात्रज चौकात शिंदे गटाचे नेते विजय शिवतरे यांच्या विरोधात बाबासाहेब पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष राकेश कामठे यांनी एक बॅनर लावलंय. या बॅनरवर 'लक्षात घ्या... दादाच ठवतात पुरंदरचा विजय. दादा महाराष्ट्राचे, बारामतीचे, पुरंदरचे, नावात विजय पुरेसा नाही, दादांच्या ही मनात असावं लागतो' असा मजकूर लिहिण्यात आलाय. याच आशयाचे काही बॅनर अजून काही ठिकाणी लावण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

विजय शिवतारेंची निवडणूक लढवण्याची घोषणा : बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीत बिघाडी पाहायला मिळत आहे. शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेत बारामती लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलंय. सासवडमध्ये शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत शिवतारे यांच्या अपक्ष उमेदवारीचा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला होता.

उर्मट माणसाचा पराभव करायचा : अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा करताना शिवतारेंनी अजित पवारांवर टीका करत "त्यांनी नीच पातळी गाठली. गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो आणि गाव निर्माण करायला अनेक हात लागतात. तशी परिस्थिती इथं निर्माण झाली," असं म्हटलं होतं. तसंच "आपल्याला एका उर्मट माणसाचा पराभव करायचा आहे. या लढाईतला रामाच्या बरोबर असलेला बिभीषण विजय शिवतारे आहे," असंही त्यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा :

  1. Ajit Pawar Vs Vijay Shivtare : 'बारामती मतदार संघात तिसरा पर्याय देणार'; विजय शिवतारेंचा पुन्हा हल्लाबोल
  2. Vijay Shivtare : बघतोच कसा निवडून येतो म्हणणाऱ्या अजित पवारांना शिवतारेंचं आव्हान, बारामती लोकसभा लढवण्याचा केला ठराव

ABOUT THE AUTHOR

...view details