ETV Bharat / state

प्रियकराच्या शर्टवर बिर्याणीच्या तेलाचे डाग; संशयातून 'लिव्ह इन'मधील प्रेयसीनं आधी केलं टक्कल अन् मग केली आत्महत्या - GIRL COMMITS SUICIDE IN DOMBIVLI

प्रियकरानं ऑफिसला जाताना बाहेरुन बिर्याणी पार्सल नेली. मात्र या बिर्याणीच्या तेलाचे डाग त्याच्या शर्टवर पडल्यानं प्रेयसीला संशय आला. यातूनच तिनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

Girl Commits Suicide In Dombivli
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 20, 2025, 1:39 PM IST

ठाणे : प्रियकरानं कार्यालयात बिर्याणी पार्सल नेल्यानंतर त्याच्या शर्टवर तेलाचे डाग पडल्यानं प्रेयसीनं त्याच्यावर अवैध संबंधाचा संशय घेतला. या संशयातून प्रेयसीनं आपलं टक्कल करत बेडरुमध्ये जाऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना डोंबिवलीतील टिळकनगरात घडली. "याप्रकरणी डोंबिवली पूर्वेतील टिळकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू करण्यात आला आहे," अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांनी दिली. शनीकुमार गंगाराम शिंदे असं या घटनेतील प्रियकराचं नाव आहे. हे दोघंही डोंबिवलीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांना लवकरच लग्न करायचं होतं.

प्रियकराच्या शर्टावर पडलेल्या तेलाच्या डागानं लावली आग : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील ठाकुर्ली भागातील खंबाळपाडा परिसरातील एका इमारतीमध्ये मृत प्रेयसी तिचा प्रियकर शनीकुमार गंगाराम शिंदे ( 30) याच्यासोबत लिव्ह इन रिलेनशिपमध्ये राहत होती. त्यातच सोमवारी सकाळी प्रियकर ऑफिस कामानिमित्तानं बाहेर पडला, मात्र त्याला सोबत जेवणाचा डब्बा प्रेयसीनं दिला नव्हता. त्यामुळं प्रियकरानं बाहेरून बिर्याणी पार्सल घेऊन ती सोबत पिशवीत ठेवून ऑफिसमध्ये गेला. त्यावेळी पार्सलमधील बिर्याणीतील तेल बाहेर पडून शर्टाला लागून डाग पडला. काम आटपून घरी आल्यानंतर त्याला प्रेयसीनं तेलाचा डाग कसा पडला, असा प्रश्न विचारला. त्यावर बिर्याणी तेलाचं डाग असल्याचं त्यानं तिला सांगितलं. मात्र तिनं त्याच्या बोलण्यावर विश्वास न ठेवत तिला त्याच्या चारित्र्यावर संशय येऊन तिनं वाद घातला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

प्रेयसीनं टक्कल करुन केली आत्महत्या : सोमवारी सायंकाळी दोघात वादानंतर आपलं लग्न जवळ आलं आहे. तू आता किरकोळ कारणावरून का भांडतेस, असे प्रश्न प्रियकरानं प्रेयसीला विचारले. त्यावर तिनं आता तू लग्न कसा करतोस मी बघते, असं रागात बोलून डोक्यावरील सगळे केस स्वताच्या हातानं कापून टाकले. हा प्रकार पाहून प्रियकरानं मी घर सोडून जातो, असं बोलून तो बाहेर जाण्यास निघाला. त्यावेळी प्रेयसीनं तुला जायचं तिथं जा, असं बोलून ती रागात बेडरूममध्ये जाऊन आतून दरवाजा बंद केला. त्यानंतर बेडरूममध्ये प्रेयसीनं गळफास घेतला. दुसरीकडं प्रियकराच्या हा प्रकार नंतर लक्षात आल्यावर त्यानं बेडरूमचा दरवाजा तोडून प्रवेश केला. लगेच त्यानं तिला घेऊन डोंबिवली पूर्वेतील महापालकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आणलं. मात्र येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आता टिळकनगर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. विशेष म्हणजे दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहितीही समोर आली आहे.

हेही वाचा :

  1. सासरच्या जाचाला कंटाळून डॉक्टर तरुणीची आत्महत्या; रशियात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पतीला ठोकल्या बेड्या - Doctor Girl Suicide Case
  2. "लग्न केलं नाहीस तर घरच्यांना सोडणार नाही"; तरुणाच्या जाचाला कंटाळून 15 वर्षीय मुलीनं संपवलं जीवन, दहा जणांवर गुन्हा दाखल - Minor Girl Suicide Nashik
  3. पोक्सो गुन्ह्यातील नराधमानं जामीनावर सुटल्यावर दिला पीडितेला त्रास; अल्पवयीन मुलीची आत्महत्या, आरोपीला अटक - Satara Minor Girl Suicide

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.