महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

विधानपरिषदेच्या चार जागांचे आज निकाल लागणार, तीन मतदारसंघातील मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण - Vidhan Parishad Election Result - VIDHAN PARISHAD ELECTION RESULT

विधानपरिषदेच्या चार जागांचे आज निकाल लागणार आहेत. यामध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघांचा समावेश आहे.

vidhan parishad result results today
vidhan parishad result results today (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 1, 2024, 1:44 PM IST

Updated : Jul 1, 2024, 2:01 PM IST

मुंबई - विधानपरिषदेच्या चार जागांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात कोण बाजी मारणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. दुसरीकडं मुंबई शिक्षक मतदार संघात, नाशिक शिक्षक मतदार संघात महायुतीच्याच पक्षांमध्ये लढत आहे.विधान परिषद कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर मतदार संघातील मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण झाली.

  1. मुंबई शिक्षक मतदारसंघ- एकूण 12 हजार मतपत्रिकांची जुळवणी पूर्ण झाली आहे. यातील 402 मतपत्रिका अवैध आढळल्या आहेत. 5800 हा कोटा विजयी घोषित करण्यासाठी ठरविण्यात आला आहे.
  2. कोकण पदवीधर मतदारसंघ-321 केंद्रातील एकूण मतपत्रिकांची मोजणी 8 फेऱ्यांमध्ये पूर्ण झाली आहे. तर एकूण 1 लाख 43 हजार 297 मतपत्रिका वैध आढळल्या आहेत. प्रत्येक टेबलवर 1 हजार मतपत्रिका देण्यात आल्या आहेत. यातून वैध आणि अवैध मतपत्रिकांची तपासणी करत एकूण 4 फेऱ्या होणार आहेत. त्यानंतर अवैध मतपत्रिका वगळून वैध मतांचा कोटा ठरवला जाईल.
  3. मुंबई पदवीधर मतदारसंघ- एकूण 67 हजार 644 मतपत्रिकांची जुळवणी पूर्ण झाली. मतपत्रिकांच वैध-अवैध तपासणी सुरू आहे. त्यानंतर वैध मतांचा कोटा ठरविण्यात येणार आहे.

या मतदारसंघात आहे निवडणूक

  • मुंबई शिक्षक मतदार संघ-शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ज. मो. अभ्यंकर, भाजपकडून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे काम करणारे शिवनाथ दराडे, शिक्षक सुभाष मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकनाथ शिंदे गटाकडून शिवाजी शेंडगे हे पुरस्कृत उमेदवार निवडणूक लढवित आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजी नलावडे हे निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघात पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
  • मुंबई पदवीधर मतदार संघ :मुंबई पदवीधर मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून अनिल परब, भाजपाकडून किरण शेलार निवडणकुीच्या रिंगणात आहेत.
  • कोकण पदवीधर मतदार संघ : कोकण पदवीधर मतदार संघामध्ये भाजपाकडून निरंजन डावखरे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. तर या मतदारसंघात काँग्रेसकडून रमेश कीर यांना उमेदवारी देण्यात आली.
  • नाशिक शिक्षक मतदार संघ : नाशिक शिक्षक मतदार संघामध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे संदीप गुळवे, शिवसेना शिंदे गटाकडून किशोर दराडे रिगंणात आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षानं महेंद्र भावसार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर अपक्ष म्हणून विवेक कोल्हे हे निवडणूक लढवत असल्यानं नाशिक शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे.

हेही वाचा-

  1. मतदान केल्यानंतर भाजपाच्या महिला शहराध्यक्षावर गुन्हा दाखल, 'ही' चुक भोवली! - MUMBAI TEACHER CONSTITUENCY
  2. नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत उत्स्फूर्त प्रतिसाद; 21 उमेदवार रिंगणात... - Nashik Teacher constituency
Last Updated : Jul 1, 2024, 2:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details