महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

निवडणूक आयोग भाजपाचा घरगडी; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, भाजपाकडून तक्रार दाखल - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान पार पडलं. तर निवडणूक आयोगाकडून मतदान करण्याचं आवाहन केलं जातं. मात्र, निवडणूक आयोग हा भाजपाचा घरगडी असल्याप्रमाणं काम करत असून पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलाय.

Lok Sabha Election 2024
उद्धव ठाकरे (Mumbai Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 7:21 PM IST

Updated : May 20, 2024, 9:53 PM IST

मुंबई Lok Sabha Election 2024 : ज्या ठिकाणी शिवसेना उबाठा पक्षाला जास्त मते मिळत आहेत अशा ठिकाणी जाणिवपूर्वक मतदारांची अडवणूक केली जात आहे. जेणेकरुन मतदार कंटाळून घरी परत जाईल अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. मोदी सरकारकडून निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा केला जात आहे, निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा केला जातोय, अशी जळजळीत टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलीय.


मतदारांना जाणिवपूर्वक अडवलं :लोकसभेच्या मतदानासाठी मुंबईसह परिसरातील मतदार मोठ्या संख्येनं घराबाहेर पडले होते. रांगा लावून मतदान करण्याचा त्यांचा निर्धार होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या कार्यपध्दतीमुळं हे मतदार घरी परतले. मात्र, सायंकाळी सहा वाजेपर्यंत जे मतदार रांगेत असतील त्या सर्वांचं मतदान करुन घ्यावं लागतं. त्यामुळं मतदारांनी पुन्हा मतदार केंद्रावर जावे आणि मतदानाचा अधिकार बजावावा, असं आवाहन ठाकरे यांनी केलं होतं. ज्या ठिकाणी मतदारांना जाणिवपूर्वक अडवलं जात आहे. त्याठिकाणी कार्यरत असलेल्या निवडणूक आयोगाच्या बुथवरील अधिकाऱ्यांची नावं लिहून आम्हाला द्यावीत, आम्ही ती जाहीर करु आणि गरज भासल्यास न्यायालयासमोर दाद मागू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

भाजपाची ठाकरेंविरोधात तक्रार : मतदान प्रक्रिया सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली. एवढेच नाही तर सत्ताधारी भाजपावर बिनबुडाचे आरोप करतानाच त्यांनी निवडणूक आयोगावरही आरोप केले आहेत. हे आचारसंहितेचे उल्लंघन असून, यावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडं केली


राजकीय कट : मोदी सरकारला पराभवाची धास्ती आहे. त्यामुळं त्याच्याविरोधात असलेल्या ठिकाणी कमी मतदान करण्याचा डाव खेळला जात आहे. मात्र, त्यांचा डाव उलटवण्यासाठी मतदारांनी पुन्हा मतदान केंद्रात जावं आणि गरज भासल्यास पहाटेपर्यंत मतदान करावं, असं ठाकरे म्हणाले होते. विरोधात असलेल्या मतदारांनी मतदानाला उतरु नये यासाठी मोदी सरकारचा दिरंगाईचा डाव असल्याचा आरोप ठाकरे यांनी केलाय. आम्हाला जास्त मतदान होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी जाणिवपूर्वक असे प्रकार केले जात होते. कारण नसताना अधिकारी मतदारांना छळत होते. नावे वगळली जाणे हा त्यांचा आवडता खेळ आहे. मतदानाला गेलेल्यांना जाणिवपूर्वक वेळ लावला जात होता. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जाणारा हा खेळ आहे. शिवसेनेला मतं मिळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी मतदान कमी होण्यासाठी हा डाव खेळला जात होता. यामध्ये राजकीय कट असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केलीय.

मतदारांमध्ये नाराजी : मुंबईत उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात असल्यानं त्याचा त्रास नागरिकांना झाला. मोठ्या रांगा आणि मतदान पुढे सरकत नसल्यानं मतदारांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपध्दतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा -

  1. मतदान सुरळीत होण्यासाठी मतदारांना मदत करा, आदित्य ठाकरेंची निवडणूक आयोगाच्या नियोजनावर व्यक्त केली नाराजी - Lok Sabha Election 2024
  2. संजय राऊतांचे भाऊ आणि पोलिसांमध्ये मतदान केंद्राबाहेर वादावादी, कारण काय? - Lok Sabha Election 2024
  3. उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच काँग्रेसच्या 'पंजा'ला केलं मतदान; म्हणाले... - Lok sabha election
Last Updated : May 20, 2024, 9:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details