महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

ठरलं! ठाकरे गटाची 15 उमेदवारांची यादी जाहीर होणार, ठाकरे गट किती जागा लढवणार? - Lok Sabha Elections - LOK SABHA ELECTIONS

Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि काँग्रेसनं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. तर दुसरीकडं ठाकरे गटाचा अजून एकही उमेदवार जाहीर झालेला नाहीय. ठाकरे गटाची उमेदवारी यादी कधी जाहीर होणार याबाबत खासदार संजय राऊत यांनी माहिती दिलीय.

Uddhav Thackeray
शिवसेना ठाकरे गट

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 8:00 PM IST

Updated : Mar 26, 2024, 8:39 PM IST

मुंबई Lok Sabha Elections: शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी यादी बुधवारी (27 मार्च) जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलीय. महाविकास आघाडीतील जागावाटपाची यादी बुधवारी जाहीर होणार आहे. तसंच ठाकरे गटाच्या 15 उमेदवारांची यादी बुधवारी सकाळी जाहीर होणार आहे. त्यामुळं या यादीकडं शिवसैनिकांचं लक्ष लागलंय.

ठाकरे गट 22 जागा लढवणार? : पुढे बोलताना राऊत म्हणाले की,"बुधवारी सकाळी 15 उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत. महाविकास आघाडीत ठाकरे गट 22 जागा लढवणार आहे. शिवसेनेत संभाव्य उमेदवारांना काम करण्याच्या सूचना दिल्या जातात. उद्धव ठाकरेंनी अनेक उमेदवारांना काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाविकास आघाडीत अजिबात मतभेद नाहीत. बुधवारपर्यंत महाविकास आघाडीची जागावाटपाची यादी जाहीर होणार आहे."

'वंचित'ला अजून घटकपक्ष समजतो : "'वंचित' हा महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष आहे. प्रकाश आंबेडकर महत्त्वाचे नेते आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या आम्ही सतत संपर्कात आहोत. आम्ही चार जागांचा त्यांना प्रस्ताव दिला होता. पण, त्यांच्या बोलण्यावरुन चार जागा त्यांना मान्य नाहीत असं दिसतंय. तिन्ही पक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी आम्ही पुन्हा चर्चा करू आणि सकारात्मक निर्णय होईल. आजही त्यांना आम्ही 'मविआ'तील घटकपक्ष समजतो," असं संजय राऊत म्हणाले.

जयंत पाटील आढावा घेतील : "सध्या जयंत पाटील हे सांगली, सातारा आणि हातकंणगले येथील मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. या जागांवरील निर्णय लवकर होईल. सांगली, सातारा आणि हातकणंगले हा भाग जयंत पाटील यांनी जवळून पाहिलाय. तसंच तिथलं राजकारण देखील पाहिलंय. त्यांना तिथल्या परिस्थितीची चांगली जाण आहे. त्यामुळं आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यानंतर सांगली, सातारा आणि हातकणंगले या जागेवर कोण उमेदवार द्यायचा याचा निर्णय घेऊ," असं संजय राऊत यांनी सांगितलं.

सांगलीच्या जागेवर आम्ही ठाम : "सांगलीच्या जागेवर आम्ही ठाम आहोत आणि सांगलीची जागा शिवसेना लढवणार आहे. तसंच भिवंडीच्या जागेवरुन जी चर्चा सुरू होती, ती जवळजवळ संपली आहे. भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहे. आमच्याकडं ए,बी,सी असा कुठलाही प्लॅन नाही. या देशातील हुकूमशाही संपवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं, ही महाविकास आघाडीतील नेत्यांची भूमिका आहे. आम्ही सतत महाविकास आघाडीतील नेते प्रकाश आंबेडकर यांच्या संपर्कत आहोत. त्यांच्याशी चर्चा करतोय आणि त्यांनी आमच्यासोबत यावं, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत," असं राऊत म्हणाले.

सुप्रिया सुळे विक्रमी मतांनी विजयी होतील : "जे मांडलिक आहेत, जे आश्रित आहेत, ते इतरांनी फेकलेल्या तुकड्यावर जगत असतात. त्यामुळं त्यांना बोलण्याचा अधिकार नसतो. त्यांची भूमिका नसते. ते ठामपणे एवढ्या जागा पाहिजेत असं बोलू शकत नाहीत. कारण ते गुलाम असतात. इतरांच्या तुकड्यांवर जगणाऱ्यांना तो हक्क नसतो," असा टोला यावेळी संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नाव न घेता लगावलाय. "आम्ही दिल्ली येथे लोटांगण घालत नाहीत. आम्ही ज्या बैठका घेतो, त्या मातोश्री किंवा सिल्वर ओक येथे घेतो. शिवसेनेच्या उमेदवारांची बुधवारी यादी जाहीर होईल. महादेव जानकर यांनी वैयक्तिक भूमिका घेतली, त्याबद्दल मी अधिक भाष्य करणार नाही. परंतु बारामती येथे अनेकांनी दावा केला आहे. त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या विक्रमी मताधिक्यानी निवडून येतील," असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा -

  1. कमी कार्यकाळ बाकी असल्यानं अकोला पश्चिमची पोटनिवडणूक रद्द; नागपूर खंडपीठाचा निर्णय - Akola West Assembly By Election
  2. काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंनी शक्तिप्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज - Vikas Thackeray File Nomination
  3. "कोल्हापूर, साताऱ्याची जागा निसटली मग कसला 45 प्लस...", जयंत पाटलांनी उडवली भाजपाची खिल्ली - Jayant Patil On Mahayuti
Last Updated : Mar 26, 2024, 8:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details