लातूर : विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षाचे नेते राज्यभर प्रचार करत आहेत. रात्रंदिवस नेत्यांकडून सभांचा धडाका लावला आहे. विरोधकांकडून सत्ताधार्यांवर टीका केली जात आहे. अशातच सभेच्या ठिकाणी पोहचण्यापूर्वी यवतमाळच्या वणीमध्ये सोमवारी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली होती. तपासणीचा व्हिडिओ खुद्द उद्धव ठाकरे यांनी काढला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा लातूरमधील औसा येथे निवडणूक आयोगाचे कर्मचारी बॅग तपासणी करत असल्याचा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांनी काढला.
भाजपा नेत्यांना का रोखलं जात नाही? : "संपूर्ण 'तडजोड आयोग' निर्लज्जपणे उद्धव ठाकरेंना त्यांच्या सभेत जाण्यास उशीर करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रश्न असा आहे की, भाजपाच्या लुटीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले पंतप्रधान किंवा इतर मंत्री अशा प्रकारे का रोखले जात नाहीत?" अशी तिखट प्रतिक्रिया औसा येथे उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणीवरुन आदित्य ठाकरे यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची तपासली बॅग (उद्धव ठाकरे) पंतप्रधान मोदींचीही बॅग तपासा : बॅगांची तपासणी करतानाचा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांनी चित्रित करून निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मीच पहिला गिऱ्हाईक आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी कर्मचाऱ्यांना विचारला. "पंतप्रधान मोदी सोलापुरात येत आहेत, त्यांचीही बॅग तपासा. माझी तपासणी होत असेल, तर त्यांचीही तपासणी झाली पाहिजे," अशी खोचक विनंती उद्धव ठाकरेंनी केली. "बॅगा तुमच्याकडेच ठेवा. हवंतर माझ्या पुढच्या मुक्कामी या बॅगा घेऊन या," असा टोलाही ठाकरेंनी कर्मचाऱयांना लगावला.
उद्धव ठाकरेंनीही केली चौकशी : उद्धव ठाकरेंनीही बॅगांची तपासणी करणाऱया कर्मचाऱ्यांना अनेक प्रश्न विचारले. कर्मचाऱ्यांना त्यांचं नाव, त्यांचं नियुक्ती पत्रक, एवढंच नव्हं, तर त्यांच्या खिशातील पाकिटात किती पैसे आहेत? असे प्रश्न कर्मचाऱ्यांना त्यांनी विचारले. "सर्वांचे फोटो आले असून, तुमची चांगली प्रसिद्धी होणार आहे. माझा तुमच्यावर राग नाही. सध्या एकतर्फी कारभार सुरू असून, जो नियम मला तर तोच नियम मोदींना लागू झाला पाहिजे," अशी मागणीही ठाकरेंनी केली.
हेही वाचा
- "मी कॉमनमॅन सर्वसामान्यांना बनवणार सुपरमॅन"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
- "हम एक रहेंगे तो सेफ रहेंगे"; चिमूरच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा दावा
- "अरे ओवैसी, कुत्ता भी ना पे** करेगा औरंगजेब की पहचान पर, अब तिरंगा लहरायेगा पाकिस्तान पर"; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार