महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

Amsha Padvi: लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच ठाकरेंना मोठा धक्का, 'हा' आमदार करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश - thackeray faction MLC amsha padvi

Amsha Padvi : नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी चेहरा म्हणून आमश्या पाडवी ओळखले जातात. मात्र आता ते शिंदे गटात जाणार असल्यानं ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे.

Amsha Padvi: लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच ठाकरेंना मोठा धक्का, 'हा' आमदार करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
Amsha Padvi: लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच ठाकरेंना मोठा धक्का, 'हा' आमदार करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 17, 2024, 1:51 PM IST

नंदुरबार Amsha Padvi : नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली होती. त्यातच आज सकाळी त्यांनी मुंबई इथं शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केलाय. यामुळं ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालंय. यामुळं लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय.

आमश्या पाडवींचा शिंदे गटात प्रवेश : ठाकरे गटाचे विधान परिषदेतील आमदार आमश्या पाडवी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुंबईतील शिवसेना कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांकडून देण्यात आलीय. आमदार आमश्या पाडवी हे अक्कलकुवा येथील शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. यामुळं नंदुरबार जिल्ह्यातून ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. त्यांनी ठाकरे गटाचं जिल्ह्यात बऱ्यापैकी वर्चस्व तयार केलं होतं. मात्र, ते शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटात मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे.


आदिवासींचे प्रश्न मांडणारा आक्रमक नेता : आमश्या पाडवी यांनी 1995 पासून कोवली विहीर गावाचे सरपंच बनून स्थानिक राजकारणाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी दोन वेळा अक्कलकुवा पंचायत समितीचं सभापतीपद भूषवलंय. वीस वर्षांपासून ते0 पंचायत समिती सदस्यही होते. तसंच अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक पदही त्यांनी भूषवलंय. गेल्या अकरा वर्षापासून सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आदिवासींच्या विविध प्रश्नांवर आक्रमक मोर्चे काढणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हापासून ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. दोन वेळा त्यांनी शिवसेनेकडून विधानसभा लढवलीय. मात्र दोन्ही वेळा त्यांच्या पराभव झाला. मात्र आक्रमक आदिवासी चेहरा असल्यानं शिवसेनेच्या वतीनं त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं. विधान परिषदेत आदिवासींच्या बुलंद आवाज म्हणून आमश्या पाडवी यांची ओळख निर्माण झालीय.

हेही वाचा :

  1. Uddhav Thackeray : रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली; भाजपावर हल्लाबोल करत म्हणाले, "त्यांचं हिंदुत्व गोमूत्रधारी..."
  2. Anil Parab On Eknath Shinde : खासदारांना उमेदवारी मिळाली नाही तर राजीनामा देणार का? अनिल परब यांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल
  3. Uddhav Thackrey News : "भाजपानं निवडणुकीसाठी उमेदवार..", आघाडीत येण्याची ऑफर दिल्यानं गडकरींचा उद्धव ठाकरेंना टोला

ABOUT THE AUTHOR

...view details