महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

तलाठी भरती २०२३ची निवड यादी जाहीर; महसूल विभागातील ३०६ जणांची पदोन्नती - Vikhe Patil On Talathi Recruitment

Talathi Bharti Result 2023 : महाराष्ट्र महसूल विभागाने तलाठी भरती २०२३ परिक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. आज 306 कर्मचाऱ्यांना नायब तहसिलदार (राजपत्रीत, गट -ब) या संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहेत.

Radhakrishna Vikhe Patil
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2024, 8:51 PM IST

मुंबई Talathi Bharti Result 2023 : तलाठी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. तर दुसरीकडे राज्याच्या महसूल विभागात आधुनिकता आणत असताना विभागातील अधिकाऱ्यांनाही पदोन्नतीने पदस्थापना दिली आहे. आज महसूल विभागामध्ये अव्वल कारकून आणि मंडळ अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या, एकूण 306 कर्मचाऱ्यांना नायब तहसिलदार (राजपत्रीत, गट -ब) या संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

तलाठी भरती २०२३ची निवड यादी जाहीर: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलडाणा, वाशिम, परभणी, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यांच्या तलाठी परीक्षेचा निकाल लागला आहे.

संबंधित कागदपत्रे पडताळणी: निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिध्दी नंतर उमेदवाराची ओळख प्रमाणपत्रे आणि संबंधित कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी याचप्रमाणे समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही अंतिम नियुक्तीपुर्वीची कार्यवाही, संबंधित जिल्हा निवड समितीकडून जिल्हास्तरावर करण्यात येईल, असं महसूल विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

पदोन्नतीने पदस्थापना :राज्याच्या कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या महसूल विभागामध्ये अव्वल कारकून आणि मंडळ अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या एकूण 306 कर्मचाऱ्यांना नायब तहसिलदार (राजपत्रीत, गट -ब) या संवर्गात पदोन्नतीने पद स्थापना देण्यात आली आहे.

अशी आहे संख्या : छत्रपती संभाजीनगर विभागात 8, जालना 5, परभणी16, हिंगोली4 , बीड 5, लातूर 5 , धाराशिव 8, नांदेड असे एकूण 59. तर अमरावती विभागात14, अकोला 10, बुलडाणा 14, वाशिम 7, यवतमाळ असे एकूण 52. तसेच नागपूर विभागात 12, भंडारा 4, गोंदिया 6, चंद्रपूर 18, गडचिरोली 13, वर्धा असे एकूण 57. त्याचबरोबर नाशिक विभागात 9, अहमदनगर 10, जळगाव 9, धुळे 4, नंदुरबार असे एकूण 36. कोकण विभागात मुंबई शहर 13, मुंबई उपनगर 22, ठाणे 17, पालघर 9, रायगड 19, रत्नागिरी 13, सिंधुदुर्ग 6, विभागीय आयुक्त कोंकण यांचे कार्यालय 2, राज्य निवडणूक आयोग 1 असे एकूण 102.

हेही वाचा -

  1. Vikhe Patil On Balasaheb Thorat : आरक्षणाबाबत विरोधकांची भूमिका अस्पष्ट, अपयश झाकण्यासाठी थोरातांचं वक्तव्य
  2. Radhakrishna Vikhe Patil: सरकार खरेच लोणी आयात करणार का? दुग्धविकास मंत्र्यांनी 'हे' दिले उत्तर
  3. Radhakrishna Vikhe Patil News : हिंदुत्वाच्या विचारांशी फारकत घेतलेल्या नेत्याकडून महाराष्ट्राला अपेक्षा नाही- राधाकृष्ण विखे पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details