सोलापूर Lok Sabha Election 2024 :देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापूर शहरातील होम मैदान या ठिकाणी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला मराठी भाषेमध्ये आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यांनतर त्यांनी संविधान बदलणार आणि आरक्षण संपवणार, असा खोटा आरोप आमच्यावर इंडिया आघाडीकडून केला जातो. यावेळी सभेत बोलताना मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल केलाय.
"पाच वर्षांत पाच पंतप्रधान" : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात इंडिया आघाडीचा पराभव झाला आहे, याची जाणीव नसतानाही काँग्रेस आपली ‘कलंकित पार्श्वभूमी’ असूनही देशाची सत्ता हिसकावण्याचे स्वप्न पाहत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. सोलापुरातील सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, INDI ब्लॉकमध्ये नेतृत्वावरच 'महायुद्ध' सुरू आहे आणि त्यांनी "पाच वर्षांत पाच पंतप्रधान" असा फॉर्म्युला आणला आहे, जे शेवटी देशाला लुटतील. इंडिया आघाडीचा नेता कोण होणार यावर सध्या जोरदार युद्ध सुरू आहे. एवढा मोठा देश ज्याचा चेहरा ओळखत नाही अशा व्यक्तीच्या हाती तुम्ही सोपवू शकता का, असं मोदींनी म्हटलंय. यावेळी मोदींनी दावा केला की, जर इंडिया आघाडी सत्तेवर आली तर ते पाच वर्षांच्या कार्यकाळात एक वर्षात एक पंतप्रधान फॉर्म्युला घेऊन काम करेल.
10 टक्के दिलं आरक्षण: सत्ता बळकावण्यासाठी हे लोक देशाचं विभाजन करत आहेत. आता पाच वर्षांत पाच पंतप्रधानांचा नवा फॉर्म्युला आणला आहे. गेल्या 10 वर्षात तुम्ही मोदींचा प्रत्येक पैलू पाहिला असला तरी, इंडिया आघाडीचा नेता कोण असेल यावर एकमत नाही. गेल्या 10 वर्षांत मोदींच्या म्हणजे आपल्या सरकारनं खऱ्या सामाजिक न्यायावर भर दिलाय. मागासवर्गीयांचे हक्क हिरावून न घेता, आम्ही आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना 10 टक्के आरक्षण दिलंय. सर्वसामान्य प्रवर्गातील गरीब लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही 10 टक्के आरक्षण दिलं आणि देशातील दलित नेत्यांनी त्याचं सकारात्मक स्वागत केलं, असं नरेंद्र मोदी म्हणाले.