पुणेSupriya Sule Challenges BJP : देशात लोकसभा निवडणुका लागल्या आहेत. त्यातच आज राहुल गांधीची भारत जोडो न्याय यात्रा मुंबई दाखल झालीय. महाविकास आघाडी त्याठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन करत असताना मुंबईतच भाजपाकडून 'काँग्रेस नसती तर काय झालं असतं', या पुस्तकाचं प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते होणार आहे. कुठेतरी भाजपा राहुल गांधीजींचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या राजकीय चर्चा होत आहेत. त्यावर सुप्रिया सुळे यांनी भाजपावर कडाडून टीका केलीय.
मी कधीही चर्चा करायला तयार : यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "फिल्डवरल्या नेत्याचं आणि पुस्तक प्रकाशनाचं काही संबंध असेल असं मला वाटत नाही. पण काँग्रेस नसती तर या देशाचं काय झालं असतं? तुमचं काय झालं असतं यावर चर्चा करायला मी कधीही तयार आहे." खासदार सुळे पुढं म्हणाल्या की, "इलेक्ट्रॉल बॉंड्समध्ये मोठा घोटाळा झालाय. त्याचबरोबर राज्यांमध्ये पाच टप्प्यात निवडणुका होत आहेत. मोठ्या टप्प्यांमध्ये निवडणुका का होत आहेत? यामागेही काहीतरी आहे का? हे पाहावं लागेल."
- शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत. त्यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाले, " राजकारण हा माझा व्यवसाय नाही. मी या भागातले प्रश्न मांडण्यासाठी संसदेत जाते. त्यामुळं या भागातले प्रश्न मांडण्यासाठीच लढत आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.