महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

शरद पवार यांचं नाव घेतल्याशिवाय 'यांची' हेडलाईन होत नाही; सुप्रिया सुळेंची टीका - Devendra Fadnavis

Supriya Sule Attack : निवडणूक आयोगानं शरद पवार यांना 'तुतारी' हे पक्ष चिन्ह दिलं आहे. याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंनी पवारांवर टीका केली होती. त्यांच्या टीकेला खासदार सुप्रिया सुळे प्रतिउत्तर दिलंय.

Supriya Sule Attack On Devendra Fadnavis
सुप्रिया सुळेंची टीका

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2024, 3:53 PM IST

प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे

पुणे Supriya Sule Attack : शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नवीन चिन्ह 'तुतारीचं' (Sharad Pawar Party Symbol) लोकार्पण रायगडावर करण्यात आलंय. त्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी "40 वर्षानंतर त्यांना रायगडावर जावं लागलं" अशी टीका केली होती, तर देवेंद्र फडवणीस यांनी "अजित पवार यांच्यामुळं शरद पवार यांना 40 वर्षाने शिवाजी महाराज आठवले," असं म्हटलं होतं. "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शरद पवार यांचं नाव घेतल्याशिवाय हेडलाईन होत नाही म्हणून ते अशी टीका करतात" अशी प्रतिक्रिया, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलीय.

पक्षाला चिन्ह आणि नाव: नवीन चिन्हावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष होता. निवडणूक चिन्ह मिळाल्यानं आता पक्षात उत्साह पसरला आहे. पक्षाला नावही मिळू नये आणि चिन्ह मिळू नये असा युक्तीवाद सुप्रीम कोर्टात केला होता. परंतु कोर्टाने त्यांचं न ऐकता चिन्ह देण्यास सांगितलं, त्यामुळं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला."

ही भाजपाची परंपरा : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी छोटे पक्ष संपवा असं म्हटलंय. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे की, "ही दडपशाही आहे, हे लोकशाही नाही. त्यांच्या मनात जे आहे ते त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवलं. त्यात नवीन काही नाही ती भाजपाची परंपरा आहे. याचा विचार त्यांच्या मित्रपक्षानं करणं गरजेचं आहे."

विचाराची लढाई :भाजपाच्या मित्रपक्षाने जर विचार केला आणि काही मित्र पक्ष बाजूला आले तर तुम्ही त्यांच्यासोबत आघाडी करणार का? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "तसं होऊ शकतं ते जर आमच्या सोबत लढू इच्छित आहेत तर आम्ही तसा विचार करू. ही आमची वैयक्तिक लढाई नाही विचाराची लढाई आहे."

हेही वाचा -

  1. Supriya Sule Attack on Govt त्यांना सत्ता काम करायला नाही तर दादागिरी करायला हवी होती, सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका
  2. "विकासाचा रथ पुढं नेण्यासाठी.... "; सुनेत्रा पवारांची बारामतीकरांना साद, प्रचारात सक्रिय
  3. बारामती लोकसभेत नणंद-भावजय लढत; खासदार सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...

ABOUT THE AUTHOR

...view details