मुंबई lok sabha election :लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडलं. मुंबईत ५८ टक्के मतदान झालयं. पहिल्या चार टप्प्यातील मतांची टक्केवारी पाहिल्यास पाचव्या टप्प्यात सर्वात कमी मतदान झाल्याचं निदर्शनात आलं. मुख्यत: मुंबई येथील अनेक मतदारसंघात मोठा घोळ झालं असल्याची माहिती पुढे आली आहे. यात अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीमध्ये तांत्रिक बिघाड, वीज खंडित आणि इतर गैरसोयीमुळं मुंबईकरांना मनस्ताप सहन करावं लागलं. यामुळे निवडणूक आयोगाचा ढिसाळ आणि अनागोंदी कारभार समोर आल्यामुळं मतदाराने संताप व्यक्त केलाय, याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
मतदान केंद्रावर अनेक समस्या डोंगर : मुंबईकरांनी सकाळपासून मतदानासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. परंतु अनेक मतदारांची मतदार यादीत नावेच नव्हती यामुळं कित्येक मतदारांना मतदान करण्यापासून मुकावं लागलं. मुंबईसारख्या महानगरीमध्ये असं घडणं ही बाब विचार करण्यासारखी आहे.
मतांवर परिणाम : घाटकोपर, शिवाजीनग, गोवंडी आणि मानखुर्द अशा नावाजलेल्या मतदारसंघात ईव्हीएम मशीन चालत नसल्याचे निदर्शनास आलं काही ठिकाणी चक्क वीज खंडीत झाल्याचा प्रकारही घडल्यामुळं काही वेळासाठी मतदान थांबवल्याच्या घटनासमोर आल्या. यामुळं मतदारांना त्रास सहन करत ताटकळ थांबावं लागलं काही मतदार गैरसोयींमुळ मतदान न करताच माघारी फिरावं लागलं याचा थेट परिणाम मतांवर झाला आहे.
चौकशीचं आदेश : मुंबईतील काही ठिकाण तसचं भिवंडी ठाणे आणि ठाणे कल्याण या लोकसभा मतदारसंघात मतदान अतिशय संथ गतीने मतदान झाल्याचा आरोप मतदारांनी केला आहे. तसचं काही राजकी नेत्यांनीही याबाबत तक्रार केली आहे. मतदान केंद्रावर लोकांची गैरसोय होत आहे असा अरोप ठाकरे गटातील प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदत मांडला. यानंतर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केला व त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.