मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. 288 जागांसाठी मतमोजणी केली जात आहे. राज्यात कोण सत्तेत असणार? कोण विरोधात? याचा फैसला आज होणार आहे. तर 288 पैकी 226 जागांवर महायुती पुढे आहे.
पदाधिकाऱ्यांनी केला विजयाचा जल्लोष :महायुतीच्या महाविजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभ दीप या निवासस्थानी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विजयाचा एकच जल्लोष केला. यावेळी खासदार शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना पेढे भरवून विजयाचा जल्लोष केला. हा विजय महायुतीनं गेल्या दोन वर्षात घेतलेले अनेक निर्णय आणि 'लाडकी बहीण योजना', 'शासन आपल्या दारी अभियान' आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने घेतलेल्या अथक मेहनतीचा विजय असल्याचं खासदार शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
राज्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष, पेढे वाटून आनंद केला साजरा (ETV Bharat Reporter) देवेंद्र फडणवीस यांच्या आईनं केलं अभिनंदन : "राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी या प्रमुख आघाड्यांमध्ये प्रामुख्याने लढत होताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत जनतेलं महायुतीला आणि पर्यायानं भाजपाला मोठा विजय मिळवून दिला असून, भाजपा महायुती सध्याच्या घडीला 226 जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्र आणि जनतेची आता अशी इच्छा आहे की, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांनी भूषवावं", असंही देवेंद्र फडणवीसांच्या आई सरिता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय.
भावांच्या मागे लाडक्या बहीणी राहिल्या उभ्या : "लाडकी बहीण या योजनेची घोषणा महायुती सरकारनं पावसाळी अधिवेशनात केली होती. केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकार मतदारांवर प्रभाव पडण्यासाठी ही योजना असल्याची टीका विरोधकांनी केली होती. परंतु, निकालात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनं कमाल केली असं म्हणू शकतो. सर्व बहिणीही महायुतीच्या भावांच्या मागे उभ्या राहिल्या. शासन आपल्या दारीलाही विसरता येणार नाही. थेट लोकांना लाभ मिळत राहण्याचं काम केलं. फेक नरेटिव्ह ऐवजी आज विकासाला मतं मिळाली," असा विश्वासही खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -
- मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीच्या कलानुसार महायुती 200 हून अधिक जागांवर आघाडीवर
- मतमोजणीला सुरुवात; पुणे जिल्ह्यात महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
- हा जनतेचा कौल नाही, भाजपानं यंत्रणा हातात घेतली - संजय राऊत