मुंबई Sanjay Shirsat : लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले असून देशात भाजपाप्रणित एनडीए सरकार सत्तेत विराजमान होईल अशा प्रकारचा अंदाज सर्वच एक्झिट पोल एजन्सी दर्शवीत आहे. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये राहायचं नसल्याचा खळबळजनक दावा केलाय. तशा प्रकारच्या हालचाली देखील सुरु असल्याचं म्हटल्यामुळं राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरु झालीय.
उद्धव ठाकरे महायुतीत आल्यास आश्चर्य वाटू नये : उद्धव ठाकरे महायुतीसोबत येणार का, या जर तरच्या भूमिका आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. यायचं की नाही यायचं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांना घ्यावं की नाही उद्धव ठाकरे ठरवणार नसून, गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इथं एकनाथ शिंदे ठरवणारे आहेत. याविषयी पडद्यामागं काही हालचाली सुरु आहे का या प्रश्नाला उत्तर देताना संजय शिरसाठांनी पडदा बाजूला केलेला असून हालचाली थेट होत असून सामान्य माणसांना देखील कळत असल्याचं शिरसाठ सांगताय. यांचे प्रयत्न सर्व बाजूनं सुरु असून यांना त्या आघाडीत राहायचं नाही हे जवळपास निश्चित झाल्याचा दावा शिंदे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी केलाय. तसंच उद्या ते आले तर आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. भूमिका स्पष्ट असली पाहिजे, भविष्यात आपण काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही, नाहीतर 2019 सारखी पुनरावृत्ती होत असेल तर त्याला काही अर्थही नसल्याचं संजय शिरसाठ यांनी म्हटलंय.