महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"ज्यांच्या मनातच 'शिवद्रोह' त्यांना महाराजांचा इतिहास काय कळणार", जयंत पाटील यांनी पुराव्यासह दिलं प्रत्युत्तर - Shivaji Maharaj Statue Collapse - SHIVAJI MAHARAJ STATUE COLLAPSE

Shivaji Maharaj Statue Collapse : शिवाजी महाराजांनी सूरतला नोटीस पाठवत खंडणी मागितली होती. त्यांनी सूरत लुटली नव्हती. त्यामुळं ते लुटेरे नव्हते, असं विधान जयंत पाटील यांनी केलं. त्यांच्या या विधानावर भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी टीका केली. प्रवीण दरेकर यांच्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षानं पुराव्यासहित प्रत्युत्तर दिलंय.

Shivaji Maharaj Statue Collapse
जयंत पाटील (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2024, 11:52 AM IST

मुंबई Shivaji Maharaj Statue Collapse :मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील शिवप्रेमी आणि विरोधक सरकारविरोधात संतप्त झाले आहेत. दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती, असं विधान केलं, तेव्हा विरोधकांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. आता एका मुलाखतीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या विधानामुळं सत्ताधारी पक्षाकडून टीका करण्यात आलीय.

देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नसल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रातील शिवप्रेमी आणि विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. फडणवीसांनी केलेल्या विधानावर बोलताना जयंत पाटील यांनी "शिवाजी महाराजांनी सूरतला नोटीस पाठवत खंडणी मागितली होती. त्यांनी सूरत लुटली नव्हती. त्यामुळं ते लुटेरे नव्हते," असं विधान केलं.

शिवप्रेमींची माफी मागा :जयंत पाटील यांच्या वक्तव्यावरुन भाजपा आक्रमक झाली असून आमदार प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षावर निशाणा साधला. "महाविकास आघाडीला खंडणी आणि वसुलीची सवय आहे. त्यामुळं जयंत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडणी मागितली, अशा प्रकारची मुक्ताफळे उधळी आहेत. असं विधान करताना त्यांना लाज कशी वाटली नाही. जयंत पाटलांनी शिवप्रेमींची माफी मागावी." असं प्रवीण दरेकर म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीनं जयंत पाटील यांच्या वक्तव्याबाबत इतिहासातील संदर्भ देत एक ट्विट केलंय. ट्विटमध्ये लिहिलं की, "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय पराक्रमाचं विस्तृत वर्णन कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज' या चरित्रलेखनातून केलं. या चरित्राची पहिली आवृत्ती ही 1906 मध्ये प्रसिद्ध झाली. या चरित्राच्या भाग एकविसाव्यातील पान क्रमांक 355 वर 'खंडणी' या शब्दाचा उल्लेख आहे."

शिवछत्रपतींचा इतिहास समजून घ्यायला हवा :1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसर्‍यांदा सूरत लुटून पुन्हा स्वराज्याकडं मोर्चा वळवला, त्यावेळी त्या शहरातील रहिवाशांना उद्देशून महाराजांनी एक पत्र लिहिलं. सदर पत्रात "तुम्ही प्रतिवर्ष बारा लाख रुपये ‘खंडणी’ बिनबोभाट पावती केल्यास तुमच्या शहरास पुनः लुटीची भीती उरणार नाही. असा उल्लेख आहे. 'खंडणी' या शब्दाचा अर्थ हा आजच्या काळाप्रमाणं त्यावेळी गैरकृत्य असा नव्हता. त्यामुळं सत्ताधाऱ्यांनी 'खंडणी' शब्दावरुन आरोप करण्याऐवजी अगोदर शिवछत्रपतींचा इतिहास समजून घ्यायला हवा, ज्यांच्या मनातच 'शिवद्रोह' आहे, त्यांना महाराजांचा इतिहास कुठून कळणार." असं ट्विट करत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

हेही वाचा

  1. "पळून पळून कुठं जाणार होता?", जयदीप आपटेच्या अटकेवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया - Eknath Shinde
  2. "माफी तोच मागतो, जो चुकीचं काम करतो", राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र - Shivaji Maharaj Statue Collapse
  3. शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अखेर अटक, 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी - shivaji maharaj statue collapse

ABOUT THE AUTHOR

...view details