महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

शिवसेनेनं 15 उमेदवारांची यादी केली जाहीर; भाजपा नेत्या शायना एनसींना शिवसेनेकडून तिकीट

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं 15 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपा नेत्या शायना एनसी यांना शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केली आहे.

SHIVSENA
शिवसेना उमेदवार यादी (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2024, 10:34 PM IST

Updated : Oct 28, 2024, 10:59 PM IST

मुंबई : शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीसाठीच्या १५ उमेदवारांची नवी यादी जाहीर केली. ही शिवसेनेची तिसरी यादी आहे. या यादीद्वारे शिवसेनेनं भाजपाच्या शायना एन. सी. यांना मुंबईतील मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी दिली. शायना एनसी या वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होत्या. मात्र, त्यांना वरळीतून उमेदवारी मिळू शकली नाही. मात्र, आता त्यांना शिवसेनेनं मुंबादेवीमधून उमेदवारी दिली.

शिवसेना उमेदवारांची तिसरी यादी (Source : Shivsena X Handle)

शिवसेनेची तिसरी यादी जाहीर: शिवसेनेनं सिंदखेडराजा मतदारसंघातून शशिकांत खेडेकर यांना, तर कन्नड मतदारसंघातून संजना जाधव यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. कल्याण ग्रामीणमधून राजेश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संजना जाधव यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर लगेच त्यांना उमेदवारी दिली आहे.

शिवसेना उमेदवारांची तिसरी यादी (Source : Shivsena X Handle)

शायना एनसी, संजना जाधवांना उमेदवारी : भाजपा नेत्या शायना एनसी वरळी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होत्या. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वरळीत मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. यानंतर शायना एनसी यांना शिवेसनेकडून मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर, रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांना देखील कन्नड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली.

शिवसेनेच्या उमेदवारांची तिसरी यादी

क्र. उमेदवाराचे नाव मतदारसंघ

1 - शशिकांत खेडेकर : सिंदखेडराजा

2 - घनसावंगी हिकम : उढाण

3 - संजना जाधव : कन्नड

4 - राजेश मोरे : कल्याण ग्रामीण

5 - भांडूप (पश्चिम) : अशोक मोरे

6 - शायना एनसी : मुंबादेवी

7 - अमोल खताळ : संगमनेर

8 - भाऊसाहेब कांबळे : श्रीरामपूर

9 - विठ्ठलराव लंघे-पाटील : नेवासा

10 - अजित पिंगळे : धाराशिव

11 - दिग्विजय बागल : करमाळा

12 - विठ्ठ्ल राऊत : बार्शी

13 - राजेश बेंडल :गुहागर

हेही वाचा -

  1. "महाराष्ट्रातील जनता गहारीचा डाग..."; पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर हल्लाबोल
  2. रिपब्लिकन पक्षाला 'या' 2 जागा, महायुतीकडून रामदास आठवलेंची नाराजी दूर
  3. भाजपाची तिसरी यादी जाहीर; सुरेश धस आष्टीतून रिंगणात, आतापर्यंत 146 उमेदवार उतरवले मैदानात
Last Updated : Oct 28, 2024, 10:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details