ETV Bharat / politics

"नाना पटोले आरएसएसचे एजंट", काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा हल्लाबोल, पक्षानं धाडली नोटीस - BUNTY SHELKE CRITICIZES NANA PATOLE

नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातीस काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांचा पराभव झाला होता. दरम्यान, त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आरएसएसचे एजंट असल्याचं म्हटलं आहे.

BUNTY SHELKE CRITICIZES NANA PATOLE
बंटी शेळके, नाना पटोले (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2024, 9:05 PM IST

Updated : Dec 1, 2024, 9:24 PM IST

नागपूर : नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या बंटी शेळके यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पराभव झाल्यानंतर आता बंटी शेळके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. "काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट आहेत," असा थेट आरोप बंटी शेळके यांनी केला. त्यामुळं काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता काँग्रेसनं बंटी शेळके यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मी राहुल गांधींचा शिपाई : मध्य नागपूर या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे. मध्य नागपूरची जागा काँग्रेसनं हरावी, यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाणीवपूर्वक पक्षाचे संघटन हे कमजोर करून ठेवलं होतं. मतदारसंघात मला कुठलीही मदत न केल्याचा आरोप बंटी शेळके यांनी केला. "माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात काँग्रेसच आहे. मी नाना पटोले यांचा शिपाई नसून राहुल गांधी यांचा शिपाई आहे," असं म्हणत बंटी शेळके यांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

बंटी शेळके यांचा नाना पटोलेंवर आरोप (Source - ETV Bharat Reporter)

तेव्हा कुठे होते नाना पटोले : "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासमोर आरएसएसचा गणवेश जाळण्याचं काम मी केलं. त्यावेळी लोकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. नाना पटोले त्यावेळी माझ्याबद्दल एकही शब्द बोलले नाही. नाना पटोले तेव्हा कुठे गेले होते?," असा सवाल बंटी शेळके यांनी केला. "आरएसएसचे एजंट नाना पटोले यांच्या मतदारसंघातील देवरी बॉर्डरवर मी आरटीओ विरोधात आंदोलन केलं. आंदोलनाला परवानगी देऊ नका, असं नाना पटोले यांनी सांगितलं. उलट माझ्यावर हल्ला झाला त्यावर ते एकही शब्द बोलले नाहीत. नाना पटोलेंची कॉंग्रेस कार्यकर्त्यांबद्दल द्वेष भावना असल्यामुळं ते आरएसएसचे एजंट आहेl," असं बंटी शेळके म्हणाले.

बंटी शेळके यांना कारणे दाखवा नोटीस : ऐन निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याच्या तक्रारी आलेल्या नेत्यांना काँग्रेस पक्षातून निलंबन करण्याच्या नोटीस पाठवल्या जात आहेत. नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराला देखील पक्षशिस्तीचा भंग केल्यानं निलंबनाची नोटीस देण्यात आली आहे. नागपूर मध्यचे उमेदवार बंटी शेळके यांनी नाना पटोले यांचे आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असल्याचा आरोप केला होता. खोटे व बिनबुडाचे आरोप केल्यानं पटोले यांची बदनामी झाली. त्यामुळं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरुन शेळके यांना पक्षातून निलंबित का करु नये? यासाठी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. यावर बोलताना बंटी शेळके म्हणाले, "मी नोटीसचं उत्तर दिलं असून उलट त्यांनाच जाब विचारलाय, त्याचं उत्तर मला अद्याप मिळालं नाही."

मला उमेदवारी मिळू नये, यासाठी प्रयत्न : "मी मध्य नागपुरमधून गेल्या निवडणूकीत केवळ 4 हजार मतांनी पराभूत झालो होतो. असं असतानाही तीन जणांचं नाव प्रदेश कार्यालयातून पाठवण्यात आलं असता माझं नाव उमेदवार म्हणून त्या यादीत टाकण्यात आलं नाही. प्रियांका गांधी स्वतः माझ्या प्रचारासाठी आल्या होत्या. मात्र, या प्रचारासाठी काँग्रेसनं मला ताकद दिली नाही," असा आरोप बंटी शेळके यांनी केला.

हेही वाचा

  1. "माझी प्रकृती ठीक"; एकनाथ शिंदे ठाण्यात परतले, राजकीय घडामोडींना वेग
  2. "...म्हणून मी दरे गावाला आलो, 'त्या' सर्व केवळ चर्चाच"; एकनाथ शिंदेंची दरे गावातून सूचक प्रतिक्रिया
  3. 'EVM हॅक करून देतो,' असा दावा करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

Last Updated : Dec 1, 2024, 9:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.