मुंबई Vidhan Sabha Election :विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून आतापासूनच रणनीती आखली जात आहे. याचाच एक भाग म्हणून आज शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात 113 विधानसभा मतदारसंघासाठी 46 विधानसभा प्रभारी आणि 93 विधानसभा निरिक्षकांच्या अधिकृतरित्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या अधिकृत पत्रकावरून ही यादी जाहीर करण्यात आली आहे.
कोण आहेत प्रभारी? :शिवसेनेच्या 46 विधानसभा प्रभारीमध्ये मंत्री गुलाबराव पाटील, चंद्रकांत रघुवंशी, मंत्री दादाजी भुसे, राजेंद्र चौधरी, हेमंत गोडसे, सुहास कांदे, कमलेश राय, खासदार मिलिंद देवरा, यशवंत जाधव, खासदार रवींद्र वायकर, राहुल शेवाळे, शिशिर शिंदे, माजी खासदार संजय निरुपम, मंत्री अब्दुल सत्तार, अर्जुन खोतकर, मंत्री तानाजी सावंत आदींचा समावेश करण्यात आला आहे.