ETV Bharat / state

जागावाटपाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान; म्हणाले... - Devendra Fadnavis

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2024, 8:59 PM IST

Devendra Fadnavis : राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. अशातच महायुतीच्या जागावाटपाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलं आहे. ते पुण्यातील वंदे भारत ट्रेनच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी आले होते.

Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित्र)

पुणे Devendra Fadnavis : राज्यात पुढील एक ते दोन महिन्यात विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. दोन्ही आघाड्यांकडून जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. महायुतीच्या जागावाटपाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की, जागावाटप अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे आणि लवकरच ते पूर्ण करू.

वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ : पुणे-हुबळी आणि पुणे-कोल्हापूर तसेच नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.

प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV BHARAT Reporter)

महाराष्ट्राला तीन वंदे भारत ट्रेन : यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला तीन वंदे भारत ट्रेनची भेट दिली. महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा सुखकर प्रवासासाठी फायदा होणार आहे. वंदे भारत ट्रेन भारताची शान आहे. याने निश्चित महाराष्ट्रच्या प्रवाशांचा प्रवास हा गतिमान आणि सुखकर होणार आहे. भारताने देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन तयार केली आहे. जगातील विकसित देशांमध्ये ज्या पद्धतीने प्रवाशांना सुविधा मिळतात त्याच पद्धतीच्या सुविधा या वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून मिळणार आहेत.

पुण्यातील गोळीबाराच्या घटनेवर ते म्हणाले..: धनगर आरक्षणबाबत फडणवीस म्हणाले की, याबाबत बैठक झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून रोड मॅप बनवला आहे. मी दुसऱ्या बैठकीत असल्यानं त्या बैठकीला नव्हतो. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्या दिशेने आपण पुढे चाललो आहोत. तर पुण्यातील गोळीबाराच्या घटनेवर ते म्हणाले, कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही. तत्काळ त्याला शोधून काढतो आणि जेलमध्ये टाकतो.

हेही वाचा -

  1. गणपती विसर्जनाबाबत 'फेक न्यूज' पसरवल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीसांसह नितेश राणेंविरोधात तक्रार दाखल - karnataka Ganpati Fake News
  2. नरेंद्र मोदी, अमित शाह ते शरद पवार 'यांनी' राजकारणासोबतच गाजवलंय क्रिकेटचं मैदान - Political Interference in Cricket
  3. गौतम अदानीकडून मोदींना पेन्शन मिळते, खासदार संजय राऊत यांची टीका - Old Pension Scheme

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.