ETV Bharat / politics

बॉलीवूड अभिनेत्री प्रकरणी तीन आयपीएस अधिकारी निलंबित - 3 IPS Officer Suspension - 3 IPS OFFICER SUSPENSION

3 IPS Officer Suspension : मुंबईतील एका अभिनेत्रीला बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप असलेल्या तीन आयपीएस अधिकाऱ्यांना आंध्र प्रदेश सरकारनं निलंबित (IPS Officers Suspended) केलं आहे.

3 IPS Officer Suspension
तीन आयपीएसअधिकारी निलंबित (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2024, 7:43 PM IST

हैदराबाद 3 IPS Officer Suspension : मुंबईतील अभिनेत्रीला बेकायदेशीरपणे ताब्यात घेणे आणि धमकी दिल्याप्रकरणी तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. माजी गुप्तचर प्रमुख पीएसआर अंजनेयुलू, कांथी राणा टाटा आणि विशाल गुन्नी यांना सरकारनं निलंबित (IPS Officers Suspended) केलं आहे. सरकारने तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित करताना GO क्रमांक 1590, 1591, 1592 जारी केला आहे. डीजीपीच्या अहवालाच्या आधारे तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. डीजीपींनी यापूर्वीच एसीपी हनुमंत राव आणि इब्राहिमपट्टणम सीआय सत्यनारायण यांना निलंबित केलय. याप्रकरणी आणखी काही पोलिसांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

एसआयटीचं आयोजन : मुंबईतील चित्रपट अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीनुसार, विजयवाडा सीपी एसीपी श्रावंती रॉय यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नियुक्त करण्यात आली होती. मुंबईतील अभिनेत्री, तिचे पालक आणि इतरांची एसआयटीने चौकशी केली. त्यांच्याकडून जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल तयार करून तो डीजीपींना सादर करण्यात आला. डीजीपींनी हा अहवाल सरकारला सुपूर्द केला. अहवाल तपासल्यानंतर सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केलं.

अधिकाराचा केला गैरवापर : या प्रकरणी दिलेल्या आदेशात राज्य सरकारनं म्हटलं की, विजयवाडाचे माजी पोलीस आयुक्त कांथी राणा टाटा तपासावर देखरेख करणारे अधिकारी म्हणून अपयशी ठरले आहेत. या प्रकरणात माजी गुप्तचर प्रमुख अंजनेयुलु यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचं आढळून आलं आहे. याप्रकरणी 02 फेब्रुवारी 2024 रोजी एफआयआर नोंदवण्यात आला होता. त्यानंतर अभिनेत्रीला अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते.

अभिनेत्रीवर आरोप : 2 फेब्रुवारी 2024 रोजी विशाल गुन्नी यांच्या टीमने सकाळी 6:30 वाजता एफआयआर नोंदवला होता. डीजीपीला पूर्व माहिती न देता अभिनेत्री मुंबईला गेल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं. तपासात ती साडेसात वाजता मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बसल्याचं समोर आलं. डीजीपीला न कळवता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही पूर्व माहिती न देता मुंबईला गेल्याचा आरोपही अभिनेत्रीवर दाखल करण्यात आला.

अधिकाराचा केला गैरवापर : त्याचवेळी मुंबईला गेलेल्या विशाल गुन्नी यांच्या पोलीस पथकाने याच्या संबंधित टीए आणि डीएची किमान बिलेही सादर केली नसल्याचा संशय निर्माण झाला होता. एफआयआर नोंदवल्याच्या काही तासांत कोणत्याही लेखी पुराव्याशिवाय अटक प्रकरणाचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोपही यात करण्यात आला आहे. या प्रकरणात, माजी गुप्तचर प्रमुख पीएसआर अंजनेयुलू, माजी विजयवाडा सीपी कांथी राणा टाटा आणि विजयवाडा डीसीपी विशाल गुन्नी हे तपासात अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. मुंबईतील सज्जन जिंदाल बलात्कार प्रकरणातील ही अभिनेत्री आहे.

हेही वाचा -

  1. पोलिसांच्या ताब्यात असताना तरुणाचा धावत्या रेल्वेमधून पडून मृत्यू, उपनिरीक्षकासह दोन अंमलदार निलंबित - Thane crime news
  2. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : निलंबित पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची मुंबईत बदली, उलट सुलट चर्चांना उधाण - Badlapur Sexual Abuse Case
  3. पोलिसानंच डिलीव्हरी बॉयला केली बेदम मारहाण; वरिष्ठांनी केलं निलंबित - Police Beat Delivery Boy

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.