ETV Bharat / politics

गौतम अदानीकडून मोदींना पेन्शन मिळते, खासदार संजय राऊत यांची टीका - Old Pension Scheme

Old Pension Scheme : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांच्या राज्यभरात विविध ठिकाणी सभा, मेळावे सुरू होत आहेत. आज कोपरगावात 'महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटने'च्या वतीनं राज्य स्तरीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी सुभाष देसाई आणि खासदार संजय राऊत यांनी जुनी पेन्शन योजनेवरून सत्ताधारी विरोधकांवर टीका केली.

Sanjay Raut And Subhash Desai
संजय राऊत आणि सुभाष देसाई इन्सेटमध्ये मोदी (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2024, 6:23 PM IST

शिर्डी (अहमदनगर) Old Pension Scheme : लोकसभा निवडणुकीत जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना घरी बसवण्याचं ठरवलं होतं. मात्र दोन कुबड्या घेऊन ते उभे राहिलेत. मोदी जर घरी बसले असते तर, त्यांना 90 हजार रुपये पेन्शन सुरू झाली असती अशी खोचक टीका सुभाष देसाईंनी मोदींवर केलीय.

मोदींना 90 हजार पेन्शन मिळणार : कोपरगावात सुरू असलेल्या जुनी पेन्शन योजना संघटनेच्या अधिवेशनात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई बोलताना म्हणाले की, एकदा खासदार निवडून आला की त्याला 25 हजार रुपये पेन्शन लागू होते. त्यानंतर परत निवडून आला की, 10 हजार रुपयांनी वाढ होते. मोदी तीनवेळी खासदार झाले आहेत. पहिल्यावेळी खासदार झाले त्यावेळीचे 25 हजार आणि पुन्हा दोन टर्म खासदार म्हणून निवडून आल्यानं त्यांना 45 हजार पेन्शन आणि तेवढाच महागाई भत्ता असे 90 हजार रुपये मोदींना मिळणार आहेत. देशाच्या पंतप्रधानांना खासदार आमदारांना पेन्शन मिळवण्याचा हक्का असेल तर, या कर्मचाऱ्यांची मागणी काय चुकीची आहे.

सभेत बोलताना सुभाष देसाई आणि संजय राऊत (ETV BHARAT Reporter)

मिंदंसह देवाभाऊही नोव्हेंबर मध्ये घरी बसणार : राज्यात असलेले तीन चाकी मिंदे सरकार नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहे. मिंदे निवृत्त झाल्यानंतर त्यांना 70 हजार रुपये पेन्शन सुरू होणार आहे. तर देवा भाऊही घरी बसणार असल्यानं त्यांना 80 हजार रुपये आणि दादांनाही 90 हजार रुपये पेन्शन सुरू होणार असल्याची टीका, सुभाष देसाई यांनी जुनी पेन्शन योजना महाअधिवेशनात केलीय.

मोदींना गौतम अदानीकडून पेन्शन येते : नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना गौतम अदानी यांच्याकडून पेन्शन येत असल्याची टीका, यावेळी संजय राऊत यांनी केलीय. नरेंद्र मोदींनाचा त्यावेळी नारा होता अच्छे दिन आयेंगे, आम्हाला आमचे मागील दिवस पाहिजे आणि जुनी पेन्शन पाहिजे असल्याचही संजय राऊत म्हणाले आहेत.

हेही वाचा -

  1. पंतप्रधान मोदींना मणिपूरमधील हिंसाचार थांबवता येत नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut Attack On Pm Modi
  2. गृहमंत्री पदावरुन संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल; नागपूर प्रकरणावरुन चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका - Sanjay Raut On Devendra Fadnavis
  3. "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 'लालबागचा राजा'..."; आशिष शेलारांचा संजय राऊतांवर पलटवार - Ashish Shelar on Sanjay Raut

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.