महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेची नक्की लढत कोणाशी? संदिपान भुमरेंनी स्पष्टच सांगितलं - Sandipan Bhumre Exclusive Interview - SANDIPAN BHUMRE EXCLUSIVE INTERVIEW

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency : संभाजीनगरात ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे विरुद्ध शिंदे गटाचे संदिपान भुमरे असा सामना होणार आहे. त्यामुळं ही लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, यावरच आता महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी भाष्य केलंय.

Sandipan Bhumre Exclusive Interview
संदिपान भुमरे (reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 12, 2024, 2:35 PM IST

संदिपान भुमरे यांची मुलाखत (reporter)

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जातो. मात्र, पहिल्यांदाच या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. " ही लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना नसल्याचं विधान महायुतीचे उमेदवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केलंय. तसंच पक्ष आणि चिन्हं दोन्ही आमच्याकडं असल्यानं समोरचे बंडखोर आहेत. त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही, उद्धव ठाकरे यांच्याकडं पक्ष नाही आणि चिन्हही राहिलेलं नाही. त्यामुळं शिवसेना फक्त आमचीच आहे," असंही ते म्हणाले.

दारू व्यवसाय असला म्हणून काय झालं : पालकमंत्री संदिपान भुमरे यांची दारूची दुकानं आहेत. वर्षभरात त्यांनी अनेक दुकानं उघडल्याची टीका विरोधक विशेषतः ठाकरे गटाकडून केली जाते. त्यावर बोलताना भुमरे म्हणाले की, "कोणताही व्यवसाय हा व्यवसायच असतो. आपण आपल्या ध्येयावर, काय कामं करणार यावर बोललं पाहिजे. व्यवसायावर अनेक वेळा बोलणं झालं. आरोप करण्याचेदेखील व्यवसाय आहेतच ना. माझ्या निवडणूक अर्जात मी माझा व्यवसाय नमूद केलाय. त्यामुळं लपून ठेवण्यासारखं काही नाही. विरोधक आमच्यावर टीका करतात. पण अगोदर त्यांच्या गाडीत फिरणाऱ्या लोकांचे व्यवसाय तपासा", अशी टीका भुमरेंनी केली.

विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांनी बोलावं : पुढं ते म्हणाले की, आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन निवडणुकीत उतरलो आहे. ग्रामीण भागात जाऊन बघा असा एकही भाग नाही, जिथं मी माझा निधी खर्च केला नाही. पालकमंत्री म्हणून निधी दिला. जितकं विकासाचं काम करता येईल, तितकं मी केलं म्हणूनच आम्ही विकासावर बोला, असं म्हणतो. आम्ही विकासाचे मुद्दे घेऊनच लोकसभेच्या प्रचारात उतरलोय. समोरचे लोक विकासावर बोलत नाहीत. ते वैयक्तिक टीका करतात. त्यांनी वीस वर्ष काय काम केलं? पुढं काय करणार हेदेखील सांगावं. ही काही ग्रामपंचायत, जिल्हा परिषद महानगरपालिकेची निवडणूक नाही. त्यामुळं वैयक्तिक टीका न करता विकासावर त्यांनी बोलावं, असा सल्ला भुमरेंनी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना दिला.

आमच्या कामामुळं धनुष्यबाणाला प्रतिसाद : "निवडणुकीत अनेक मुद्दे येत असतात. मात्र, ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांनी वीस वर्ष आणि एमआयएम तर्फे इम्तियाज जलील यांनी पाच वर्षे काय केलं हे सांगावं? पालकमंत्री म्हणून मी काय काम केलं हे जनतेला माहित आहे. त्यामुळं जनतेचा कौल हा धनुष्यबाणाकडं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या काळात काय काय काम केलं, हे जनतेसमोर आहे. त्यामुळं कोणाला काही सांगायची गरज नाही. धनुष्यबाणाला या जिल्ह्यात जास्तीत जास्त मताधिक्य मिळणार," असा विश्वासही यावेळी संदिपान भुमरे यांनी व्यक्त केला.

खैरेंवर टीका : पुढं बोलताना संदिपान भुमरेंनी खैरेंवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, "खैरेंचा दुटप्पीपणा समोर येतोय, तसंच ते डुप्लिकेट वागताय असा आरोप संदीपान भुमरे यांनी केला. " खैरे मुस्लिम समाजाविषयी काही दिवसांपूर्वी काय बोलत होते? आता काय बोलताय हे तपासून बघा. त्यांची मनस्थिती ठीक नाही. कोणत्या समाजाविषयी काय बोलावं हे त्यांच्या लक्षात येत नाही. मात्र, खैरेंनी मुस्लिम समाजाविषयी अगोदर काय वक्तव्य केले? आता काय बोलत आहेत. हे मुस्लिम समाजाला चांगलं समजतंय."

मी जिल्ह्याचा रहिवासी असूनही माझ्यावर टीका : पुढं ते म्हणाले की, "खैरे यांना काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा उबाठा गटासह मतदान मिळणार नाही. कोणीही त्यांना मतदान करणार नाही. तुम्हाला निवडणुकीच्या निकालात ते लक्षात येईलच. माझा मतदारसंघ जालना जिल्ह्यात येतो. त्यामुळं मी बाहेरून आलोय अशी टीका माझ्यावर केली जाते. मात्र, मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. या जिल्ह्यातच राहतो. मी शहरातील पश्चिम मतदार संघात पंचवीस वर्षापासून राहतो. मी काय अमेरिका, पाकिस्तानमधून आलेलो नाही. मी जिल्हा बँकेत संचालक असून दूध संघ देखील माझ्याकडं आहे. तसंच माझा मुलगा जिल्हा परिषदेत आहे. त्यामुळं मला बाहेरचं म्हणनं चुकीचं आहे. तसंच मी चांगल्या मताधिक्यानं निवडून येईल," असा विश्वासही संदीपान भुमरे यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा -

  1. काय सांगता! चंद्रकांत खैरे यांच्या मुहूर्तावर संदिपान भुमरे यांनी भरला उमेदवारी अर्ज; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण - lok sabha election 2024
  2. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना 'सामना'; संदीपान भुमरेंना उमेदवारी - Lok Sabha Election 2024
  3. वाळूज दुर्घटना प्रकरणी कंपनी मालकावर आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, लोकप्रतिनिधींची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details