ETV Bharat / sports

मालिकेतील निर्णायक सामना सुरु होण्यापूर्वीच यजमान संघाला मोठा धक्का; दिग्गज खेळाडू 'आउट' - SA VS PAK 2ND ODI LIVE

पाकिस्तानविरुद्ध दुसरा वनडे सामना सुरु होण्यापूर्वी यजमान दक्षिण आफ्रिका संघाला मोठा धक्का बसला आहे.

SA vs PAK 2nd ODI
दक्षिण आफ्रिका संघ (CSA Social Media)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : 2 hours ago

केपटाऊन SA vs PAK 2nd ODI : दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज केशव महाराज डाव्या हाताच्या दुखापतीमुळं पाकिस्तानविरुद्धच्या उर्वरित वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. मंगळवारी पर्ल इथं पहिल्या वनडे सामन्यापूर्वी सराव करताना महाराजला दुखापत झाली. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज अष्टपैलू अँडिले फेहलुकवायोचा दक्षिण आफ्रिकेच्या संघात समावेश करण्यात आलं होतं. महाराज उपचारासाठी डरबनला परतणार आहे, तर त्याच्या जागी ब्योर्न फॉर्च्युइनला पाकिस्तानविरुद्धच्या उर्वरित दोन वनडे सामन्यांसाठी संघात स्थान देण्यात आलं आहे, जे अनुक्रमे गुरुवार आणि रविवारी केपटाऊन आणि जोहान्सबर्ग इथं खेळले जाणार आहेत.

काय म्हणालं क्रिकेट दक्षिण आफ्रिका : क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं यासंदर्भात एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी त्याच्या स्थितीचं पुनर्मूल्यांकन केलं जाईल. अंतिम दोन वनडे सामन्यांसाठी त्याच्या जागी ब्योर्न फोर्टुइनची निवड करण्यात आली आहे," असंही त्यात म्हटलं आहे. महाराजच्या दुखापतीमुळं दक्षिण आफ्रिकेच्या अनुपलब्ध गोलंदाजांच्या वाढत्या यादीत भर पडली आहे. यजमान ॲनरिक नॉर्टजे (फॅक्चर्ड टाय), गेराल्ड कोएत्झी (ग्रोइन), लुंगी एनगिडी (हिप), नांद्रे बर्जर (पाठीचा खालचा भाग) आणि वियान मुल्डर (फॅक्चर्ड बोट) या दिग्गज गोलंदाजां शिवाय खेळत आहेत. अलीकडेच, गकेबराहा इथं श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याच्या अंतिम दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या विजयात महाराजनं मोलाची भूमिका बजावत 76 धावांत 5 गडी बाद केले होते.

त्याच्या जागी कोणाला संधी : महाराजच्या अनुपस्थितीत, दक्षिण आफ्रिका पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी डेन पीट आणि सेनुरान मुथुसामी या फिरकी गोलंदाजी पर्यायांकडे वळू शकतं. इतर संभाव्य उमेदवारांमध्ये फलंदाजी अष्टपैलू नील ब्रँडचा समावेश आहे, जो डावखुरा फिरकी गोलंदाजी करतो आणि या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडचा दौरा केला होता; लेगस्पिनर शॉन वॉन बर्ग, ज्यानं त्याच दौऱ्यात पदार्पण केलं; आणि डावखुरा फिरकीपटू तबरेझ शम्सी, त्यानं शेवटचा 2021 मध्ये प्रथम श्रेणी सामना खेळला होता.

पाकिस्तानविरुद्ध विजयाची गरज : पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये सुरु होणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत सध्या पहिल्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी आणखी एका विजयाची गरज आहे.

हेही वाचा :

  1. 'निवृत्ती घेण माझ्यासाठी दिलासा आणि...'; भारतात परतताच अश्विनचं मोठं वक्तव्य
  2. वडिलांनी आपल्याच मुलाला दिलं टीममध्ये स्थान, आगामी दौऱ्यात एकत्र दिसणार पिता-पुत्रांची जोडी
  3. विराट कोहलीला राग अनावर, विमानतळावरच महिला पत्रकाराशी वाद; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.