नवी दिल्ली : राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्यावरून आधीच वातावरण तापलेलं असताना संसदेच्या मकरद्वारावर धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत भाजपाचे खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं सांगितलं जातंय. तर दुसरीकडं कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी धक्का दिल्यामुळं हा प्रकार घडल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय.
#WATCH | Delhi | BJP MP Pratap Chandra Sarangi says, " rahul gandhi pushed an mp who fell on me after which i fell down...i was standing near the stairs when rahul gandhi came and pushed an mp who then fell on me..." pic.twitter.com/xhn2XOvYt4
— ANI (@ANI) December 19, 2024
राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल : ओडिशाचे बालासोरचे खासदार प्रताप सारंगी आणि फर्रुखाबादचे भाजपा खासदार मुकेश राजपूत गुरुवारी (19 डिसेंबर) सकाळी संसदेच्या मकरद्वारावर झालेल्या धक्काबुक्कीत जखमी झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दुसऱ्या खासदाराला धक्का मारल्यामुळं ते माझ्या अंगावर पडले आणि गंभीर जखमी झाल्याचा आरोप खासदार सारंगी यांनी केलाय. प्रताप सारंगी मीडियासमोर आले तेव्हा त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. या घटनेनंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलय. तसंच या प्रकरणी भाजपानं दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत ज्येष्ठ नेते अनुराग ठाकूर आणि बांसुरी स्वराज यांच्यासह अनेक नेत्यांनी बाजू मांडली. भाजपाच्या शिष्टमंडळानं संसद पोलीस ठाण्यात जाऊन आपलं म्हणणं मांडलं आणि योग्य कारवाईची मागणी केली.
#WATCH | Delhi: BJP MP Anurag Thakur says, " we have filed a complaint with delhi police against rahul gandhi for assault and incitement. we have mentioned in detail the incident that happened today outside makar dwar, where nda mps were protesting peacefully... we have given a… pic.twitter.com/sKQYaTbJG9
— ANI (@ANI) December 19, 2024
तक्रार दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनुराग ठाकूर म्हणाले की, "आम्ही राहुल गांधींविरुद्ध प्राणघातक हल्ला आणि चिथावणी दिल्याबद्दल दिल्ली पोलिसांकडं तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत आज मकरद्वारच्या बाहेर घडलेल्या घटनेचा आम्ही तपशीलवार उल्लेख करण्यात आलाय. आम्ही कलम 109, 115, 117, 125, 131 आणि 351 अंतर्गत तक्रार दिली आहे. कलम 109 हत्येचा प्रयत्न आहे."
#WATCH | Delhi: BJP MP Mukesh Rajput being taken for ultrasound and other medical tests at RML Hospital. He is admitted here after sustaining injuries during jostling with INDIA Alliance MPs. pic.twitter.com/ge7FWQ4CMG
— ANI (@ANI) December 19, 2024
दोन्ही सभागृहांचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब : या प्रकरणावरुन संसदेत झालेल्या गदारोळामुळं लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचं कामकाज शुक्रवार 20 डिसेंबर सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.
मैं संसद के अंदर जाने की कोशिश कर रहा था।
— Congress (@INCIndia) December 19, 2024
लेकिन BJP के सांसद मुझे रोकने की कोशिश कर रहे थे, धक्का दे रहे थे और धमका रहे थे।
ये संसद है और अंदर जाना हमारा अधिकार है।
: नेता विपक्ष श्री @RahulGandhi pic.twitter.com/wfwAGAeruf
कॉंग्रेसकडून ओम बिर्ला यांना पत्र : काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल, के सुरेश आणि मणिकम टागोर यांच्यासह काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून आरोप केलाय की, इंडिया ब्लॉकच्या खासदारांना संसदेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलय. एवढंच नाही तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सत्ताधारी पक्षाच्या तीन खासदारांनी धक्काबुक्की केली. लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस खासदारांनी असा दावा केलाय की, ते शांततेनं निषेध करत होते. त्यानंतर पायऱ्यांवरुन संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आंदोलक खासदारांना प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं. तसंच यावेळी राहुल गांधी यांच्यावर सत्ताधारी पक्षाच्या तीन खासदारांनी हल्ला केल्याचंही ते पत्रात म्हणालेत.
Congress MPs KC Venugopal, K Suresh and Manickam Tagore write to Lok Sabha Speaker Om Birla.
— ANI (@ANI) December 19, 2024
" ... as we attempted to enter the parliament through makar dwar, the protesting mps were physically obstructed from entering...lop rahul gandhi was physically manhandled by three mps… pic.twitter.com/hn7WZiYJqR
मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले? : यासंदर्भात एक्सवर पोस्ट करत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणालेत, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अपमान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या प्रतिष्ठेचा अपमान केला आहे. त्यांनी भाजपाच्या खासदारांना इंडिया आघाडीच्या खासदारांचं शांततापूर्ण निदर्शनं थांबवण्यास भाग पाडलंय. जेणेकरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संसद, संविधान आणि लोकशाही यांच्याबद्दलची त्यांची दुर्दम्य इच्छा उघड होऊ नये. पण आम्ही ठाम राहू आणि बाबासाहेबांबद्दल निंदनीय टिप्पणी खपवून घेणार नाही. संपूर्ण देशातील सर्व जनता भाजपा/आरएसएसला कडाडून विरोध करतील."
हेही वाचा -