महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

मी लढणारा कार्यकर्ता असंच पुढे लढत राहणार; पराभवानंतर रवींद्र धंगेकर यांची पहिली प्रतिक्रिया - Lok Sabha Election Results 2024 - LOK SABHA ELECTION RESULTS 2024

Lok Sabha Election Results 2024 : पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होती. राज्यातील लक्षवेधी असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल मंगळवारी लागला. निकालानंतर रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Ravindra Dhangekar
काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर (Etv Bharat MH DESK)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 5, 2024, 4:58 PM IST

पुणे Lok Sabha Election Results 2024: राज्याचं नव्हं तर देशाचं लक्ष पुणे लोकसभा मतदारसंघाकडं लागलं होतं. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) अशी लढत पाहायला मिळाली. मंगळवारी झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) हे विजयी झाले असून तब्बल 1 लाखांहून अधिक मतांनी ते विजयी झाले आहेत.

प्रतिक्रिया देताना काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर (ETV BHARAT Reporter)

मुरलीधर मोहोळ यांना आघाडी :पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही पहिल्यापासूनच चुरशीची मानली जात होती. या निवडणुकीत पुण्यातील स्थानिक प्रश्न ते विकास कामांचे मुद्दे मांडले गेले. तब्बल 60 दिवसाच्या प्रचारानंतर पुणेकरांनी सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना आघाडी दिली.

मी लढणारा कार्यकर्ता आहे : विधानसभा मतदारसंघचा विचार केला तर कोथरूडमधून मुरलीधर माेहोळ यांना ७४ हजार ४०० मतांची आघाडी तर पर्वतीमधून २९ हजार मतांची आघाडी आणि शिवाजीनगर मधून ३ हजार मतांची आघाडी आणि कसबामधून १५ हजार मतांची आघाडी तसंच वडगावशेरी मधून १४ हजार २०० मतांची आघाडी मिळाली आहे. पराभवानंतर काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त करत मतदारांचे आभार मानले आहेत. तसंच मी लढणारा कार्यकर्ता असून यापुढं देखील लढत राहणार असल्याचं यावेळी त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं.

मोहोळ आणि धंगेकर यांच्यात लढत: पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर, वंचितचे वसंत मोरे एमआयएमचे अनिस सुंडके यांच्यासह ३५ उमेदवार रिंगणात होते. खरी लढत मुरलीधर मोहोळ आणि रविंद्र धंगेकर यांच्यात झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details