महाराष्ट्र

maharashtra

मनोज जरांगेनी योग्य ट्रॅकवर आंदोलन केलं असतं तर, माझ्यावर आंदोलनाची वेळ आली नसती - आमदार राजेंद्र राऊत - Rajendra Raut On Reservation

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2024, 8:44 PM IST

Rajendra Raut On Reservation : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं या मागणीनं महाराष्ट्र राज्य ढवळून निघालं आहे. असं असतानाच आता सोलापुरातील बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी 12 सप्टेंबरपासून ठिय्या आंदोलन सुरू केलय. यावेळी त्यांनी आरक्षणासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी केलीय. तसंच मराठा समाजानं सांगितल्यावरच मी ठिय्या आंदोलन मागे घेणार, असंही त्यांनी स्पष्ट केलय.

Rajendra Raut On Reservation
आमदार राजेंद्र राऊत (ETV BHARAT Reporter)

सोलापूर Rajendra Raut On Reservation :बार्शीत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut)यांचं 12 सप्टेंबरपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं, त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी राजेंद्र राऊत यांनी केली आहे. शनिवारी सायंकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांची भेट घेत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, समाधान झालं नाही, त्यामुळं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका राऊत यांनी घेतली. तर 'मनोज जरांगेंनी योग्य ट्रॅकवर आंदोलन केलं असतं, मला आंदोलन करण्याची वेळ आली नसती' अशी प्रतिक्रिया, राऊत यांनी दिली आहे.

विशेष अधिवेशन बोलवावे : राजेंद्र राऊत पुढे म्हणाले, "माझ्या मागणीनुसार राज्य सरकारनं तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे. तसंच सर्वच आमदारांकडून लिहून घ्यावं. त्यामुळं त्यांची भूमिका जनतेसमोर येईल. जरांगे पाटील यांनी देखील हीच भूमिका मांडावी. जरांगेंनी या अगोदर विशेष अधिवेशन बोलावून विरोधात असलेल्या आणि सत्तेत असलेल्या 288 आमदारांचं लेखी स्वरूपात म्हणणं घ्यायला पाहिजे होतं.

प्रतिक्रिया देताना आमदार राजेंद्र राऊत (ETV BHARAT Reporter)

ठिय्या आंदोलन सुरूच राहणार: शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राजेंद्र राऊत यांची भेट झाली. यावेळी राऊत यांनी वेगवेगळ्या मागण्या चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मांडल्या. विशेष अधिवेशनाची मागणी मात्र माझ्या अधिकारात नाही, असं त्यांनी सांगत हात वर केले. त्यामुळं राऊत यांचं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार आहे. जोपर्यंत विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलं जात नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती, राऊत यांनी दिली.

मराठा समाजानं सांगितल्यावरच आंदोलन मागे घेणार : राजेंद्र राऊत बोलताना म्हणाले की, समाधानाचा प्रश्नच निर्माण होत नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष अधिवेशन बोलावण्याची मुख्यमंत्र्यांकडं विनंती करतो असं आश्वासन दिलय. माझ्या ठिय्या आंदोलनावर समाज काय भूमिका घेईल तो निर्णय माझा असेल. समाजाचं समाधान झालं आणि समाजातील लोकांनी सांगितलं तरच मी ठिय्या आंदोलन मागे घेणार आहे.

हेही वाचा -

  1. मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर; महाराष्ट्राचं मणिपूर होतं की काय? 'या' आमदारानं व्यक्त केली भीती - Maratha reservation
  2. "...हा राऊत नाही तर फडणवीसांचा डाव", नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? - Manoj Jarange On Rajendra Raut
  3. "मराठ्यांच्या छाव्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका", आमदार राजेंद्र राऊतांचं मनोज जरांगेंना आव्हान - Rajendra Raut On Manoj Jarange

ABOUT THE AUTHOR

...view details