महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

वरळी कुणाचाही बालेकिल्ला नाही, राहुल नार्वेकर यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल - Aaditya Thackeray

Rahul Narvekar On Aditya Thackeray : "वरळी मतदारसंघ हा कुणाचाही बालेकिल्ला नाही, तो काम करणाऱ्याचा बालेकिल्ला होईल. सध्या वरळी मतदार संघांमध्ये अनेक नागरी समस्या आहेत. मात्र, इथल्या स्थानिक आमदारांनी काही लक्ष दिलं नाही. मात्र, आता यापुढं असं होणार नाही. काही झालं तरी या मतदार संघात आता भाजपाचाच खासदार निवडून येईल," असा दावा विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केला आहे.

Aditya Thackeray and Rahul Narvekar
आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 5:18 PM IST

मुंबई Rahul Narvekar On Aditya Thackeray : भारतीय जनता पक्षानं आपलं सर्व लक्ष आता दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघावर केंद्रित केलं आहे. या मतदार संघामधून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. या अनुषंगानं राहुल नार्वेकर यांनी सर्वात आधी वरळी विधानसभा मतदार संघावर आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. त्यासाठी राहुल नार्वेकर यांनी वरळी विधानसभा मतदार संघाचा प्रभाग निहाय दोन दिवसांचा दौरा आखला आहे.



कोळीवाड्यांचं सीमांकन करणार : "वरळी मतदार संघांमध्ये अनेक नागरिक समस्या वर्षानुवर्ष कायम आहेत. या मतदार संघाचं एक विधानसभा आणि दोन विधानपरिषद सदस्य असूनही या मतदार संघाचा विकास झाला नाही. नाल्यांची कामही झालेली नाहीत. माझ्या मतदार संघात झालेली कामं पाहता इथल्या मतदारांनी मला हे चित्र पाहण्यासाठी बोलावलं आहे, पण त्यामुळं आता या मतदार संघातही आपण लक्ष करत आहे," असं राहुल नार्वेकर म्हणाले. "वरळी कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. अन्य कोळीवाड्यांचं सीमांकन झालं, मात्र या कोळीवाड्यांचं सीमांकन झालं नाही. लवकरच याबाबत आपण एक बैठक लावून हा प्रश्नही मार्गी लावू," असंही त्यांनी सांगितलं.


दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा दावा : "दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघावर भाजपानं पुन्हा आपला दावा सांगितला. या मतदार संघात आता भाजपाचा उमेदवार विजयी होईल," असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. या मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी येणार का? असं विचारलं असता "पक्ष जी जबाबदारी आपल्यावर सोपवेल ती आपण पूर्ण करू," असंही त्यांनी यावेळी दिलेत.

हेही वाचा -

  1. 'अटल सेतू'नंतर मुंबईकरांना मिळणार 'कोस्टल रोड'चं गिफ्ट; उद्घाटनावरुन आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका
  2. 'वरळी' बस नाम ही काफी है! आगामी निवडणुकांच्या संघर्षाचं केंद्र
  3. शिवसेना शिंदे गटाचे लक्ष्य वरळी; स्थानिक आमदार म्हणतात, आधी निवडणुका घ्या

ABOUT THE AUTHOR

...view details