मुंबई PM Kisan Yojana 18th installment :पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याचं शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तातंरण करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील वाशिम येथे आयोजित कार्यक्रमात 20 हजार कोटींहून अधिक निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित केला.
18 वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा :यावेळी पंतप्रधानांनी 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये एकाच वेळी हस्तांतरित केले आहेत. पीएम मोदी किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे. देशभरातील शेतकरी PM किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याची आतुरतेनं वाट पाहत होते. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 3 हप्ते दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येतात. या योजनेअंतर्गत, एकूण 6000 रुपये सरकारकडून थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातात. PM Kisan चा 17 वा हप्ता 18 जून 2024 रोजी हस्तांतरित करण्यात आला होता. हा हप्ता स्वतः PM नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीच्या कार्यक्रमात जारी केला होता. आता दिवाळीपूर्वी 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.