पुणे Sachin Ahir On Pawar Family : पवार कुटुंबियांमध्ये सुरू असलेला वाद आता कौटुंबिक राहिला नसून तो राजकीय वाद (Pawar Family Dispute) झालाय. येणाऱ्या निवडणुकीत जनता काय ते ठरवेल, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी केलंय. ते पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे शिवजयंतीनिमित्त (Shiv Jayanti 2024) आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
कौटुंबिक राहिला नसून राजकीय वाद : "महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, त्यावरून शिवसंस्कृती जपली पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पवार कुटुंबीयातील वाद वाढत जात आहेत. हा वाद आता कौटुंबिक राहिला नसून तो आता राजकीय वाद झालाय. याला आता सर्वजण लोकशाही पद्धतीनं उत्तर देणं गरजेचं आहे आणि जे जे निवडणुकीत सामोरे जातील त्यांच्याबद्दल जनता ठरवेल की कोणी काम केलंय आणि कोण चांगला नेता आहे," असं म्हणत सचिन आहिर यांनी पवार कुटुंबीयांवर निशाणा साधलाय.
निवडणूक आयोगानं दिला निर्णय : निवडणूक आयोगानं 6 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या 10 हून अधिक सुनावणीनंतर पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या पारड्यात टाकलंय. भारतीय निवडणूक आयोगानं (ECI) बुधवारी (7 फेब्रुवारी) शरद पवार गटाला (Sharad Pawar Faction) नवीन नाव दिलंय. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला देण्याचा महत्त्वाचा निकाल निवडणूक आयोगानं मंगळवारी दिला होता. त्यानंतर लगेच शरद पवार गटालाही नवीन नाव देण्यात आलंय. आता शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' हे नाव मिळालं आहे. मात्र, पक्षाच्या चिन्हावर अद्याप काहीही निर्णय व्हायचा आहे.
हेही वाचा -
- मातोश्रीच्या पायऱ्या कोण चढलं होतं?; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांसह अमित शाहांना सवाल
- नकुल नाथ यांनी सोशल मीडियातून हटविलं काँग्रेसचं नाव, कमलनाथ यांनी ही' दिली प्रतिक्रिया
- पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती; तरीही लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम