मुंबई Nitesh Rane On Sanjay Raut : शरद पवार यांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला 100 जन्म कळणार नाही. तसंच हे जर फडणवीस यांना समजलं असतं तर तुमची अशी अवस्था झाली नसती अशी जहरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. आता यावरुन भाजपा नेते नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
"फडणवीस नावाचं रसायन तुझ्या मालकाला...", संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत नितेश राणेंचा हल्लाबोल - Nitesh Rane - NITESH RANE
Nitesh Rane On Sanjay Raut : शरद पवार यांच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे. हे जर फडणवीस यांना समजलं असतं तर तुमची अशी अवस्था झाली नसती, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. तसंच त्यांनी अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरही भाजपावर टोलेबाजी केली होती. यालाच आता भाजपा नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
Published : Sep 8, 2024, 4:51 PM IST
मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीत जाऊन काँग्रेस समोर मुजरा : संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस नावाचं रसायन काय आहे, हे तुझ्यापेक्षा (संजय राऊत) तुझ्या मालकाला समजलं असेल. देवेंद्र फडणवीस यांचा मेंदू कसा चालतो हे कधीतरी एकट्यामध्ये उद्धव ठाकरे यांना विचारा. आज त्यांच्या मेंदूचा परिणाम असा झाला आहे की, तुमच्या मालकाला मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीत जाऊन काँग्रेससमोर मुजरा करावा लागतोय. उबाठा नावाचा एक छोटासा गट तयार करून आज निवडणूक लढवाव्या लागत आहेत. मशाल चिन्ह हे सुद्धा फडणवीसांच्या डोक्याचीच देण आहे. देवेंद्र फडणवीस हे तुम्हा सर्वांचे बाप आहेत, हे तुमच्या जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढ्या लवकर तुम्हाला झोप लागेल."
निवडणुका घेण्याची खाज : अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरही संजय राऊत यांनी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, "अमित शाह दरवर्षी गणेश चतुर्थीच्या निमित्तानं मुंबईत येतात. यादरम्यान ते भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते, महायुतीचे नेते, कार्यकर्ते यांच्या घरी जाऊन दर्शन घेतात. लालबागच्या राजाचंही दर्शन घेतात. मी संजय राजाराम राऊत यांना सांगेन की, अमित शाह तुमच्या मालकासारखे अंबानीच्या घरी जाऊन प्रसाद वाटण्यासाठी बसत नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम अमित शाह दरवर्षी गणेश चतुर्थीच्या निमित्तानं करतात. मुंबई महानगरपालिका तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची खाज तुम्हाला असेल तर तुमच्या मालकाला सांगा. न्यायालयात यासंदर्भात असलेल्या ज्या याचिका प्रलंबित आहेत, त्यामुळंच या निवडणुका घेतल्या जात नाहीत. म्हणून ज्या दिवशी तुम्ही त्या याचिका मागे घ्याल त्या दिवशी मैदानामध्ये सुद्धा तुम्हाला चितपट करायला आम्ही तयार आहोत", असंही नितेश राणे म्हणाले.
हेही वाचा -