मुंबई Modi Cabinet Expansion : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले असून देशात पुन्हा एकदा मोदी सरकार अस्तित्वात येणार आहे. 8 जून रोजी मोदी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर एनडीएमधील घटकपक्षांनी भाजपाकडं आपल्या मागण्या मांडण्यास सुरुवात केल्याचं बघायला मिळतंय.
महायुतीमधील शिवसेनेसह राष्ट्रवादीचं वाढलं महत्त्व, केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी? - NDA gov formation - NDA GOV FORMATION
NDA gov formation : नरेंद्र मोदी हे 8 जूनला तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असल्याची शक्यता आहे. तसंच मोदींसह मंत्र्यांचा देखील शपथविधी त्याच दिवशी पार पडणार असल्याचं सांगितलं जातंय. नव्या सरकारमध्ये राष्ट्रवादीसह शिवसेनेला किती मंत्रीपद मिळणार, हे जाणून घ्या.
![महायुतीमधील शिवसेनेसह राष्ट्रवादीचं वाढलं महत्त्व, केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी? - NDA gov formation NDA gov formation](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/06-06-2024/1200-675-21648151-thumbnail-16x9-modi-cabinet-expansion.jpg)
Published : Jun 6, 2024, 11:51 AM IST
|Updated : Jun 6, 2024, 12:02 PM IST
पंतप्रधान मोदींनी दिला राजीनामा : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर नवीन सरकार स्थापनापूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांकडून दिल्लीत हालचाली सुरू झाल्यात. दिल्लीत इंडिया आघाडीचा घटकपक्ष तर दुसऱ्या बाजूला एनडीएमधील घटक पक्षांची बैठक पार पडली. दुसऱ्या टर्ममधील मोदी सरकारमधील मंत्र्यांची महत्वपूर्ण बैठक बुधवारी (5 जून) दिल्लीत पार पडली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडं सुपुर्द केला.
तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होणार : एनडीएच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थिती लावली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होत असल्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही सर्व घटकपक्षांनी त्यांचं स्वागत करून शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींना शिवसेनेच्या वतीनं समर्थन आणि पाठिंबाचं पत्र देण्यात आलंय. गेल्या दहा वर्षांत त्यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाचं काम झालंय. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला केंद्राकडून संपूर्ण सहकार्य आणि योगदान मिळेल. तसंच लवकरच शपथविधीची तारीख निश्चित होईल", अशी माहितीही त्यांनी दिली.
तीन मंत्रिपदं महाराष्ट्राच्या वाट्याला? :दिल्लीत भाजपा आणि एनडीएच्या घटक पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार उपस्थित राहणार आहे. तर तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला एक मंत्रीपद तर शिवसेनेच्या वाटेला एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट पद येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा -
- Cabinet Meeting : आचारसंहितेपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत 17 निर्णय; सगेसोयरे व्याख्येबाबत चार महिन्यात कार्यवाही करणार - मुख्यमंत्री
- State Cabinet Meeting : आठवड्यातील तिसरी मंत्रिमंडळ बैठक, शासन निर्णयांचा धडाका
- Cabinet Meeting : काश्मिरमध्ये महाराष्ट्र अतिथीगृह बांधण्यावर शिक्कामोर्तब, आचारसंहितेच्या तोंडावर राज्य कॅबिनेट बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय