महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"अनिल देशमुखांना नोटीस पाठवण्यात फडणवीसांचा हात", रोहित पवारांचा गंभीर आरोप, देशमुखांचाही उपरोधिक टोला... - Rohit Pawar On Devendra Fadnavis

Rohit Pawar On Devendra Fadnavis : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळं अनिल देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत आमदार रोहित पवार यांना प्रतिक्रिया दिलीय. तसंच देशमुख यांनीही खोचक ट्विट केलंय.

Rohit Pawar On Devendra Fadnavis
रोहित पवार, देवेंद्र फडणवीस (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2024, 8:13 PM IST

Updated : Sep 4, 2024, 8:59 PM IST

पुणे Rohit Pawar On Devendra Fadnavis :राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला. याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना विचारलं असता त्यांनी "अनिल देशमुख यांच्यावर राजकीय दृष्टिकोनातून कारवाई करण्यात आलीय. याआधी अनिल देशमुख यांना तुरुंगवास भोगावा लागला होता, त्यावेळी न्यायालयानं राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते." अशी प्रतिक्रिया दिली.

रोहित पवारांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. "लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला मिळालेलं यश पाहता आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या भीतीमुळं अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली. अनिल देशमुख यांना नोटीस पाठवण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला," असं रोहित पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं.

मी अजिबात भीक घालत नाही :सीबीआयकडून गुन्हा दाखल होताच अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ट्विट करत निशाणा साधला आहे. "माझ्यावर सीबीआसकडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल करण्यात आलाय. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्यानं हे कट कारस्थान सुरू झालंय. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता, न डगमगता मी भाजपाच्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे. महाराष्ट्रात फडणवीसांकडून खालच्या पातळीचं आणि विकृत मानसिकतेचं घाणेरडं राजकारण सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेनं जागा दाखवून दिली, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे," असं खोचक ट्विट अनिल देशमुख यांनी केलंय.

नेमकं काय आहे प्रकरण :अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांच्यावर भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावर मोक्का अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. खुद्द प्रवीण मुंढे यांनी सीबीआयकडे तसा जबाब नोंदवला आहे. त्यामुळं सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "मराठवाड्यात भरपूर पाऊस झाला असून, या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. विम्याचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत. यंदा पाऊस चांगला झाला, पण शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सरकारनं याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पंचनामे करायला पाहिजे," असं रोहित पवार म्हणाले.

गुंडांचं सरकार : पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि पुणे शहरात दोन दिवसांत चार जणांची हत्या झाल्याच्या घटनांसंदर्भात बोलताना रोहित पवार म्हणाले, "हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे. सरकारचे बडे नेते गुंडांसोबत फोटो काढत असतील आणि चुकीच्या लोकांकडून मंत्र्यांचा सत्कार होत असेल, तर हे सरकार सर्वसामान्यांचं नसून गुंडांचं सरकार आहे, असं सर्वसामान्यांना वाटू लागलं आहे," असं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

हेही वाचा

  1. "महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही...", हसन मुश्रीफांना समरजित घाटगेंचं प्रत्युत्तर - Samarjeet Ghatge On Hasan Mushrif
  2. रावसाहेब दानवेंच्या 'त्या' वक्तव्यामुळं उद्धव ठाकरेंची 'बार्गेनिंग पॉवर' वाढणार? काय आहेत कारणं? वाचा स्पेशल रिपोर्ट - Vidhan Sabha Election 2024
  3. शिल्पकार जयदीप आपटे पोलिसांच्या हाती लागत नाही, मग गृहखाते काय करते? संजय राऊतांचा सवाल - Sanjay Raut News
Last Updated : Sep 4, 2024, 8:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details