पंढरपूर (सोलापूर) राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत अनेकांनी संशय व्यक्त केला. पंढरपूरच्या मारकडवाडी गावाताली ग्रामस्थांनी थेट ईव्हीएममध्ये त्रुटी आहे, असा दावा करत मतदानाचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून जमावबंदी लागू केली असली तरी ग्रामस्थ मतदानावर ठाम आहेत.
Live updates- मतदानाचे साहित्य मतदानकेंद्रावरत आणण्यात आलं आहे. मतदान केंद्रावर पोलीस प्रशासन दाखल झालं आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी जमावबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितलं आहे.
- "मत्रपत्रिकेवरील मतदान आंदोलन करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. मतदान थांबविण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला. मतदान सुरू झालं की गुन्हा दाखल करण्यात येईल, असा पोलिसांकडून इशारा देण्यात आला. राम सापपुतेंना दुप्पट मते गेली आहे. पोलिसांमुळे गावकरी आलेच नाहीत. घाबरल्यानं प्रशासनानं मतप्रक्रियेला विरोध केला. माळशिरस तालुक्यातील नागरिकांचा मोर्चा काढणार आहे." असा आरोप राष्ट्रवादीचे (एसपी) आमदार उत्तम जानकर यांनी केला.
- ग्रामस्थ पोलिसांच्या दडपणाखाली-आमदार उत्तमराव जानकर म्हणाले, "ईव्हीएम आणि मतपत्रिका यांच्या मतदानाची जुळणी करण्यासाठी मतदान घेण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्यानं ग्रामस्थ मतदान करण्यासाठी घराबाहेर येत नाहीत. मारकडवाडी गावात प्रशासनाला मतदान होऊ द्यायचं नाही. चारशे-पाचशे आलेले ग्रामस्थ परत गेले. ग्रामस्थ हे पोलिसांच्या दडपशाहीखाली आहेत. प्रशासनाशी चर्चा घेऊन निर्णय घेणार आहोत".
- मतदान घेण्याची प्रक्रिया पूर्ण-सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघांमधील मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी ईव्हीमशीनवर संशय व्यक्त केला. गावात मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, अशी त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली. मात्र, ही मागणी प्रशासनानं फेटाळत गावात जमावबंदी लागू केली. ग्रामस्थांनी प्रशासनाचा आदेश धुडकावित गावात मतदानपत्रिकेवर मतदान घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.