श्रीरामपुर :श्रीरामपुर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून येथे सध्या काँग्रेस विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी रंगतदार लढत पाहवयास मिळू शकते. मात्र, इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्यानं बंडखोरी आणि त्यामुळं कोणाची डोकेदुखी वाढेल? आणि कोणाला फायदा होईल? यावर निवडणुकीच चित्र अवलंबून असणार आहे.
महायुतीत बाहेरचा उमेदवार नको : श्रीरामपुर तालुका आणि राहुरी तालुक्यातील काही भाग समाविष्ट करत श्रीरामपुर मतदार संघाची रचना करण्यात आली. कॉंग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांच्या विरोधातील नाराजीमुळं ससाणे गट बाजूला झाल्यानं उभी फुट पडलीये. तर महायुतीत बाहेरचा उमेदवार नको, हिंदुत्ववादी उमेदवार शिवसेनेनं द्यावा, अशी मागणी भाजपाकडून होत असल्यानं शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे हे इच्छुक आहेत. श्रीरामपुरमध्ये त्यांनी मेळावे घेण्यास सुरु केलीयं. श्रीरामपुरमध्ये काँग्रेस विरोधात हिंदुत्ववादी ताकद उभी केली जातं आहे. कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्ष निरिक्षकांकडे प्रशांत लोखंडे यांच्या उमेदवारीची मागणी केलीयं.
इच्छुकांची संख्येत वाढ : एकीकडे काँग्रेस मधील फुट तर दुसरीकडे महायुतीत हिंदुत्ववादी उमेदवाराची मागणी, यामुळं येथे इच्छुकांची संख्या वाढत आहे. राहुरी तालुक्यातील श्रीरामपूर मतदार संघात जोडल्या गेलेल्या 32 गावात आमदारांन कडून होणारं दुर्लक्ष त्यामुळं उमेदवारी देताना भागाला प्राधान्य देत उमेदवारी देण्याची मागणी राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे इच्छुक उमेदवार दिपक त्रिभुवन यांनी केलीय.