महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, कमराबंद चर्चेमुळं राजकीय वर्तुळात खळबळ - Maharashtra Politics - MAHARASHTRA POLITICS

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्यसभा खासदार रजनी पाटील यांनी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. विधानसभा निवडणुकीपुर्वीची ही मोठी घडामोड मानली जात आहे.

Prithviraj Chavan on Maratha reservation
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2024, 10:08 PM IST

सातारा- माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (गुरुवारी) आंतरवाली सराटीत जाऊन संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये तासभर कमराबंद चर्चादेखील झाली. "मनोज जरांगेंचा लढा स्वाभिमानी असून त्याला आधुनिक इतिहासात तोड नाही," असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाणांनी माध्यमांशी बोलताना केलं.



मनोज जरांगेंचा लढा 'स्वाभिमानी'-"मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजासाठी उभारलेला लढा हा स्वाभिमानी लढा आहे. त्यांच्या लढ्याला आधुनिक इतिहासात तोड नाही," असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. "मराठा समाजासाठी इतकं निस्वार्थीपणे आंदोलन करून भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठीशी मराठा समाज कायम खंबीर राहील," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पृथ्वीराज चव्हाण खासदार रजनी पाटील यांनी मनोज जरांगेंची घेतली भेट (Source -ETV Bharat)
बापट आयोगाकडून आकडेवारी देण्यास नकार- पृथ्वीराज चव्हाण म्हणाले," मराठा समाजाला सर्वात पहिल्यांदा ५०% आरक्षण हे छत्रपती शाहू महाराज यांनी दिले होते. त्यानंतर मी मुख्यमंत्री असताना आमच्या आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष बापट यांना विनंती केली होती. परंतु त्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची गरज नसल्याचं सांगत आकडेवारी देण्यास नकार दिला होता.


याचिकेमुळं मराठा आरक्षणाचा लाभ बंद झाला - "यासंदर्भात नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून वर्षभरात कागदपत्रे गोळा करून मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन अध्यादेश काढण्यात आला होता. त्याचा मराठा समाजातील युवकांना फायदा होत होता. पण कुणीतरी हे आरक्षण मिळू नये, म्हणून याचिका दाखल केली. त्यामुळे मराठा तरुणांना होणारा फायदा थांबविण्यात आला," असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.


देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी २०१८ साली आरक्षण देण्याचा आव आणला. पण २०१८ च्या सुरूवातीलाच केंद्र सरकारने १०२ वी घटना दुरुस्ती करून आरक्षण देण्याचा अधिकार राज्याकडून काढून टाकला होता. त्यामुळेच ते टिकले नाही-माजी मुख्यमंत्री, पृथ्वीराज चव्हाण

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत १८० उमेदवार देण्याचे जाहीर केल्यानं राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. अशा राजकीय परिस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांची कमराबंद खोलीत भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहं.

हेही वाचा-

  1. विधानसभा निवडणूक 2024 : आरक्षणावरुन गाजणार आगामी निवडणूक ?: मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळे संभ्रम - Assembly Election 2024
  2. "...तर मी राजकारणातून संन्यास घेईन", असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस? - Devendra Fadnavis News

ABOUT THE AUTHOR

...view details