महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाचा समावेश? वाचा मंत्र्यांची यादी फक्त एका क्लिकवर... - MAHARASHTRA MINISTERS LIST
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. भाजपाच्या एकूण 19 आमदारांनी, शिवसेनेच्या एकूण 11 आमदारांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस 9 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली.
महायुती सरकारमधील मंत्र्यांची यादी (Source - ETV Bharat)
नागपूर :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज अखेर 15 डिसेंबरला नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. नव्या सरकारच्या एकूण 39 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेच्या अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आणि तानाजी सावंत अशा दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.
भाजपाच्या एकूण 19 आमदारांनी, शिवसेनेच्या एकूण 11 आमदारांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस 9 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. अखेर आता मंत्रिमंडळातील नेत्यांची यादी समोर आली आहे. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण आहे यावर नजर टाकू.
महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे