मुंबई Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसुचना आजपासून जारी केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 8 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. यात मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोलीसह विदर्भातील बुलढाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ, अकोला आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. आज अधिसुचना जारी केल्यानंतर या 8 ही लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज विक्री करण्यास सुरवात होईल. तसंच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक :
- अधिसुचना : 28 मार्च 2024
- उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 4 एप्रिल 2024
- अर्जाची छाननी : 5 एप्रिल 2024
- उमेदवारी अर्ज मागं घेण्याची शेवटची तारीख : 8 एप्रिल 2024
- मतदान : 26 एप्रिल 2024
दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघ :
- वर्धा
- अमरावती
- बुलढाणा
- अकोला
- यवतमाळ-वाशिम
- परभणी
- हिंगोली
- नांदेड
पहिल्या टप्प्यात 5 जागांसाठी 183 उमेदवारी अर्ज : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 5 मतदारसंघांचा समावेश आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. पहिल्या टप्प्यात नागपूर, गडचिरोली-चिमुर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर आणि रामटेक या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या 5 पैकी 4 मतदारसंघात भाजपा आणि कॉंग्रेस यांच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होत आहे. तर रामटेक लोकसभेत कॉंग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होत आहे. या सर्व 5 लोकसभा मतदारसंघांतून तब्बल 183 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
गडचिरोलीत सर्वात कमी तर नागपुरातून सर्वाधिक अर्ज :पहिल्या टप्प्यातील या 5 मतदारसंघांत नागपूर लोकसभेतून सर्वाधिक 54 उमेदवारांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघातून सर्वात कमी 12 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. याव्यतिरिक्त भंडारा-गोंदिया लोकसभेत 40, चंद्रपुरातून 36, रामटेकमधून 41 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
हेही वाचा :
- लोकसभेची उमेदवारी मिळताच नवनीत राणांनी पतीच्या पक्षाचा दिला राजीनामा, शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये केला पक्षप्रवेश - NAVNEET RANA Joins BJP
- भाजपाचा अबकी बार 400 पारचा नारा फोल? भाजपाला 300 जागा निवडून आणणंही कठीण - Lok Sabha Elections