पुणे Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीतील राज्यातील पाचही टप्प्यातील मतदान झालं असून येत्या 4 तारखेला लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात निकाल लागणार आहे. राज्यात एकूण 48 जागा असून सर्वच पक्षातील उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. एकूणच लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आता अनेल तर्क वितर्क येऊ लागले आहेत. अनेकांचे आपापले सर्व्हे देखील समोर येऊ लागले आहेत. अशातच पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात राज्यातील 48 जागांच्या बाबत लोकसभा निवडणूक अचूक निकाल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय.
कशी असेल अनोखी स्पर्धा : पुण्याचे माजी महापौर प्रसन्न जगताप यांच्याकडून या अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलय. राज्यात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक झाली असून या संबंधी ऑनलाईन स्पर्धा असून राज्यातील 48 जागांच्या संदर्भात अचूक अंदाज काढणाऱ्या पहिल्या 3 स्पर्धकांना बक्षीस देण्यात येणार आहे. याविषयी माहिती देताना माजी महापौर प्रसन्न जगताप म्हणाले की, पुण्यात या अशा अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलय. यात जो कोणी राज्यातील 48 मतदार संघापैकी 45 हून अधिक मतदार संघात कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार विजयी होणार याबाबत जो कोणी स्पर्धक अचूक माहिती देणार, त्याला रोख 25 हजार रुपये देण्यात येणार आहेत."